Ruhollah Khomeini X
देश विदेश

Iran Vs Israel : खोमेनीला संपवण्यासाठी युद्धविराम? इराणचा सर्वोच्च नेता कुटुंबासोबत बेपत्ता? इराणमध्ये तख्तापालट होणार?

Ruhollah Khomeini : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनींनी युद्धविरामाला केराची टोपली दाखवत इस्त्रायलवर पुन्हा हल्ला केलाय. स्वत: खोमेनी अजूनही कुटुंबासह अज्ञातवासात आहेत.. काय आहे यामागचं कारण? युद्धविरामामागे इस्त्रायलचा काय डाव आहे?

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

'इराणी लोक आणि त्यांचा इतिहास अनेकांना ठाऊक असेलच. त्यामुळे इराण शरणागती पत्करणारा देश नाही', असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनींनी दिलाय. त्यामुळे एकीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यात 12 दिवसांनी युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी केलेली असली तरी इराणनं युद्धविरामाच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचं दिसतय..कारण युद्धविरामानंतरच इराणनं 6 वेळा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र इस्त्रायलवर डागली. खोमेनींनी युद्धविरामाला गांभीर्यानं का घेतलं नाही की युद्धविरामाच्या नावाखाली खोमेनींची हत्या करण्याचा डाव आखला जातोय... ..

- खोमेनींच्या हत्येचा डाव?

- युद्धविरामाच्या घोषणेनंतरही खोमेनी कुटुंबासह बेपत्ता

- युद्धविरामातून इस्त्रायल खोमेनींच्या हत्येचा डाव आखत असल्याचा संशय

- खोमेनींच्या सुरक्षेसाठी इराण रिव्होल्यूशनरी गार्डचं युनिट तैनात

- खोमेनींचा संदेश मध्यस्थामार्फत बंकरबाहेर येतो

- हत्येच्या भीतीपोटी खोमेनींकडून उत्तराधिकारी निवडीला सुरवात

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आधीच इस्त्रायल- इराण युद्ध खोमेनींच्या हत्येनेच संपेल, असं म्हटलं होतं. त्यात इराणमधल्याच अधिकाऱ्यांनी खोमेंनीना इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदावरून हटवण्याची तयारी सुरु केलीय. इस्लामिक क्रांती दरम्यान नेते पदावरून हटवलेल्या शाह मोहम्मद यांचा मुलगा रझा पहलवी याने इराणी क्रांतीमध्ये लष्कराने सहभागी व्हावं, असं आवाहन केलयं.

खोमेनी आणि त्यांचे दहशतवादी शासन इराणला मागे नेत आहे. सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे खोमेनींच्या विरोधात इराण क्रांतीमध्ये लष्करानं सहभागी व्हावं. तुम्ही इराणी क्रांतीत सहभागी झालात तर इराण तुम्हाला कधीच विसरणार नाही. यामुळे अमेरिकेच्या मध्यस्थीनं खोमेनींचा खात्मा करून 1979 प्रमाणे इराणमध्ये पुन्हा रक्तरंजित क्रांती होणार का? इराणचा पुढचा उत्तराधिकारी कोण असेल? असे अनेक सवाल निर्माण झालेत. मात्र खरचं युद्धविराम खोमेनींच्या हत्येसाठी आखला गेलाय का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT