pakistan  Saam tv
देश विदेश

बड्या बड्या बाता, इराणकडून खातोय लाथा! युद्धात मध्यस्थी करायला गेलेला पाकिस्तान डोक्यावर आपटला! होर्मुझमध्ये जहाजाला नो एन्ट्री

इराणने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. यामुळे शेजारी राष्ट्रातील नागरिकांवर येणार उपासमारीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

इराणने पाकिस्तानच्या जहाजाला प्रवेश नाकारला

होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं कडक नियंत्रण

कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर होऊ शकतो परिणाम

युद्धात मध्यस्थीचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला इराणने मोठा दणका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने पाकिस्तानच्या SELEN नावाच्या कंटेनर जहाजाला होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी नाकारली आहे. IRGC नेव्ही कमांडर अलिरेजा तंगसीरी यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

अमेरिका-इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे इराण होर्मुजच्या सामुद्रधुनीवर लक्ष ठेवून आहे. आता या भागात जहाजातून प्रवेश मिळवण्यासाठी इराणची परवानगी गरजेची असणार आहे.सामुद्रधुनीत इराणची परवानगी न घेता प्रवास करणाऱ्या जहाजांना रोखण्यात येत आहे. पाकिस्तानी जहाजाला आज बुधवारी रोखण्यात आलं आहे.

इराणच्या निर्णयाने युद्धात मध्यस्थीचा दावा करणाऱ्या पाकिस्तान उघडा पडला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी तेल टँकर 'कराची'ला जाण्यास इराणने परवानगी दिली होती. मात्र,आता SELEN कंटेनर जहाजाला प्रवेश नाकारून इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. आता पाकिस्तानच्या जहाजाला जाण्यासाठी इराणकडून परवानगी मिळाली नाही.

अमेरिका,इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील २० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची ने-आण याच मार्गातून केली जाते. आमच्या परवानगीशिवाय सामुद्रधुनीत प्रवेश मिळणार नाही. परवानगी न घेता जाणाऱ्या जहाजांना रोखणार असल्याचा इशारा इराणने दिला आहे. जहाजाला परवानगी नाकारल्याने पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक नागरिकांवर उपासणारी वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराणने पाकिस्तानचं जहाज का रोखलं?

होर्मुजच्या सामुद्रधुनीत प्रवेशासाठी परवानगी आवश्यक असल्याचे इराणने सांगितलं. त्यांनी सुरक्षा कारणास्तव जहाज रोखल्याचं सांगितलं.

होर्मुजची सामुद्रधुनी महत्त्वाची का?

जगातील २०% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गातून होते. त्यामुळे होर्मुज सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाचा व्यापारी मार्ग मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT