CHARU PANDEY SUCCESS STORY: WOMAN CRACKS 19 GOVERNMENT EXAMS, INSPIRING MILLIONS OF ASPIRANTS Saam tv
देश विदेश

Success Story : जिद्दीला सलाम! वयाच्या २३ व्या वर्षी तब्बल १९ स्पर्धा परीक्षांमध्ये यश; चारू पांडेची थक्क करणारी यशोगाथा

Charu Pandye Success Story : चारू पांडे यांनी अनेक अपयशांवर मात करत तब्बल १९ सरकारी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांनी लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उदाहरण निर्माण केले आहे.

Alisha Khedekar

  • चारू पांडे यांनी तब्बल १९ सरकारी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या

  • अपयशांनंतरही त्यांनी हार न मानता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले

  • सध्या त्या चेन्नई येथील कॅग विभागात कार्यरत आहेत

  • त्यांची यशोगाथा लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे

मुलींनी फक्त चूल आणि मुलं संभाळावं या मानसिकतेला खोडत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या छत्तीसगडच्या चारू पांडे यांनी इतिहास रचला आहे. वय वर्ष फक्त २३, कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी एक-दोन नाही, तर तब्बल १९ सरकारी परीक्षा उत्तीर्ण करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्या अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणेचा स्रोत बनल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल.

चारू पांडे यांनी लहानपणापासूनच सरकारी सेवेत करिअर करण्याचे ध्येय निश्चित केले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांच्या तयारीलाही प्राधान्य दिले. मात्र त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अपयशांचा सामना करावा लागला. काही परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, तर काही ठिकाणी अगदी थोड्या गुणांमुळे संधी हुकली. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक अपयशाकडे त्यांनी शिकण्याची संधी म्हणून पाहिले. स्वतःच्या चुका ओळखून त्या सुधारण्यावर त्यांनी भर दिला. अभ्यासाची पद्धत बदलली, वेळेचे अधिक प्रभावी नियोजन केले आणि सातत्याने मेहनत सुरू ठेवली.

चारू यांनी एसएससी सीजीएल, एसएससी सीपीओ, एसएससी सीएचएसएल, एसएससी एमटीएस, एसएससी जीडी, आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस पीओ, एसबीआय क्लर्क आणि एसबीआय पीओ यांसारख्या देशातील महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. फार कमी वयातच एकूण १९ सरकारी परीक्षा पास करत त्यांनी आपली वेगळी छाप समाजात उमटवली. हे त्यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे जिवंत उदाहरण म्हटले जाते.

सध्या चारू पांडे चेन्नई येथील कॅग विभागात कार्यरत आहेत. आपल्या जबाबदाऱ्या त्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडत आहेत. संघर्षातून यशाचा मार्ग तयार करणारी त्यांची कहाणी आजच्या तरुणांसाठी प्रेरणा देणारी ठरत असून, मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai water crisis : मुंबईकरांची चिंता वाढली! वैतरणा धरण कोरडे, ७ धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक

वायुसेनेचे विमान क्रॅश! लँडिंगनंतर विमानाला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

Kalavantin Durg : जगातील सर्वात धोकादायक किल्ला! वाचा 'कलावंतीण दुर्ग' नावाचा रहस्यमय इतिहास

Amla Benefits: २१ दिवस रोज एक आवळा खाल्ल्याने शरीरात होताता हे ७ आरोग्यदायी फायदे

बेली फॅट कमी करण्यासाठी रोज प्या 'हे' ५ नॅचरल ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT