ASI Tied To Pole And Beaten By Mob Saam Tv News
देश विदेश

Shocking: विवाहित महिलेच्या घरी पोलिसाची रासलीला! आक्षेपार्ह स्थितीत स्थानिकांनी पकडलं; चोपलं अन्.. व्हिडिओ व्हायरल

ASI Tied To Pole And Beaten By Mob: इंदूरच्या खजराणा परिसरात एका महिलेच्या घरी आक्षेपार्ह स्थितीत आढळलेल्या पोलीस अधिकाऱ्याला स्थानिकांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Bhagyashree Kamble

इंदूरमधील खजराणा परिसरातील खेडी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेच्या घरात आक्षेपार्ह स्थितीत आढळलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास स्थानिक नागरिकांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. एएसआय सुरेश बनकर हे गेल्या २ महिन्यांपासून महिलेच्या संपर्कात होते. महिलेचा तिच्या पतीशी वाद सुरू होता. त्यामुळे ती आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. याच दरम्यान, संबंधित महिलेची पोलिसाशी ओळख झाली. ते वारंवार महिलेच्या घरी जात होते.

गुरूवारी सुरेश महिलेच्या घरी होते. तेव्हा स्थानिकांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. स्थानिकांचा आरोप आहे की सुरेश त्यावेळेस दारू पिऊन शिवीगाळ करत होते. त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहून राग अनावर झाला. त्यांनी थेट त्यांना खांबाला बांधून काठीनं मारहाण केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच खजराणा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एएसआय यांची जमावापासून सुटका केली. यावेळी पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, सुरेश यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनात मिळणार कर्जमाफीची मोठी भेट? सरकारकडून हालचालींना वेग

Gaurav More: फिल्टरपाडा ते आलिशान टॉवर; गौरव मोरेला मिळाली म्हाडाच्या नव्या घराची चावी

SCROLL FOR NEXT