Indian Trafficking Google
देश विदेश

Indian Trafficking: अमेरिकेत भारतीयांची तस्करी? EDने समोर आणले कॅनडा कॉलेजची कारस्थाने

Money Laundering ED Probe: गुजरातमधील डिंगुच्या गावातील चार जणांच्या मृत्यूनंतर ही चौकशी करण्यात येत आहे. 19 जानेवारी 2022 रोजी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना या लोकांचा मृत्यू झाला होता.

Bharat Jadhav

कॅनडाच्या सीमेवरून भारतीय नागरिकांची अमेरिकेत तस्करी होत आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) याप्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात काही कॅनेडियन महाविद्यालये आणि भारतीय संस्थांचा सहभाग असल्याचा आरोप ईडीचा आहे. दरम्यान याप्रकरणात ईडीने मुंबई आणि नागपूरमध्येही छापेमारी केली होती.

गुजरातमधील डिंगुचा गावातील चार जणांच्या मृत्यूनंतर ही चौकशी करण्यात येत आहे. १९ जानेवारी २०२२ रोजी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, भावेश अशोकभाई पटेल आणि इतरांविरुद्ध अहमदाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेत ईडीने तपास सुरू केला.

बेकायदेशीर मार्गाने भारतीय नागरिकांची कॅनडामार्गे अमेरिकेत तस्करी करण्याचा कट रचल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तस्करीच्या नेटवर्कचा एक भाग म्हणून आरोपींनी कॅनडातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये व्यक्तींना प्रवेश मिळवून दिला.

या लोकांनी कॅनडाला स्टुडंट व्हिसासाठी अर्ज केला होता, पण कॅनडाला पोहोचल्यावर ते संस्थांमध्ये गेले नाहीत. तर बेकायदेशीररित्या ते सीमा ओलांडून अमेरिकेत निघून गेले. या कॅनेडियन महाविद्यालयांना दिलेली फी लोकांच्या खात्यात परत केली गेली, ज्यामुळे संस्थांच्या संगनमताचा संशय निर्माण झाल्याचं ईडीने म्हटलंय. या रॅकेटच्या माध्यमातून अमेरिकेत प्रवेश मिळवणाऱ्या भारतीय नागरिकांकडून ५५ लाख ते ६० लाख रुपये गोळा करण्यात आल्याचा आरोप आहे.

त्याच्या चालू असलेल्या तपासात, ईडीने १० आणि १९ डिसेंबर रोजी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथे ८ ठिकाणी छापेमारी केली होती. या तपासात दोन संस्था उघडकीस आल्या, त्यापैकी एक मुंबई आणि दुसरी नागपुरात होती. या संस्था कमिशनच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्यासाठी त्यांनी परदेशी विद्यापीठांशी करार केला होता. हे नेटवर्क खूप मोठं असून एक संस्था दरवर्षी सुमारे २५,००० विद्यार्थी परदेशी महाविद्यालयात पाठवते.

तर दुसरी संस्था १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पाठवते. ११२ कॅनेडियन महाविद्यालयांनी तपासाधीन असलेल्या एका युनिटशी टाय-अप केले होते. तर दुसरे युनिट १५० 150 हून अधिक महाविद्यालयांशी जोडलेले होते. कॅनडा-अमेरिका सीमेजवळ असलेल्या काही संस्था मानवी तस्करीच्या कामांमध्ये सहभागी असू शकतात, असा संशय ईडीला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT