Kazakhstan Plane Crashes: ७० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या एअरपोर्टवरील घटना; पाहा थरारक VIDEO

Kazakhstan Plane Crash Video: कझाकिस्तानच्या अकताऊ शहरातील एअरपोर्टवर लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि विमानाला आग लागली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
Kazakhstan Plane Crashes: ७० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या एअरपोर्टवरील घटना; पाहा थरारक VIDEO
Kazakhstan Plane Crash VideoSaam Tv
Published On

कझाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रशियाला जाणारे विमान अकताऊ एअरपोर्टवर कोसळलं. लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या विमानातून ७० पेक्षा अधिक प्रवासी होते. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानच्या अकताऊ शहरातील एअरपोर्टवर लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि विमानाला मोठी आग लागली. या दुर्घटनेमध्ये किती प्रवासी जखमी झाले आहेत याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आली नाही. पण या घटनेमुळे अकताऊ एअरपोर्टवर खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

रशियाला जाणाऱ्या या विमानात काही तरी तात्रिंक बिघाड झाला होता. त्यामुळे या विमानाचे अकताऊ एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करण्यात यावे यासाठी पायलटकडून परवानगी मागण्यात आली होती. विमान लँडिंग करत असताना ते धावपट्टीवर जोरात कोसळले त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Kazakhstan Plane Crashes: ७० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या एअरपोर्टवरील घटना; पाहा थरारक VIDEO
Nashik Plane Crash: नाशिकमध्ये वायूदलाचे विमान कोसळले, दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने पडले बाहेर

कझाकिस्तानच्या मीडियाने आरोग्य मंत्र्यांच्या हवाल्याने सांगितले की, एका लहान मुलासह १२ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तज्ज्ञ, ट्रॉमाटोलॉजिस्ट, न्यूरोसर्जनसह सर्व बचाव पथके घटनास्थळी पाठवली आहेत. एअर ॲम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.

Kazakhstan Plane Crashes: ७० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या एअरपोर्टवरील घटना; पाहा थरारक VIDEO
Plane Crash : हवाई दलाचं MIG- 29 विमान कोसळलं, आग्र्यात भीषण अपघात, VIDEO

रशियाला जाणाऱ्या एम्ब्रेअर 190 एएचवाय 8243 या विमानाला पक्षी धडकल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे विमानाच्या पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी अकताऊ एअरपोर्टशी संपर्क साधला. पण विमान उतरण्याआधीच स्टेअरिंग बिघडल्याने ते कोसळले आणि विमानाला आग लागली. विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Kazakhstan Plane Crashes: ७० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, कझाकिस्तानच्या एअरपोर्टवरील घटना; पाहा थरारक VIDEO
Plane Crash Video : उड्डाण भरताच विमान गरागरा फिरलं अन् कोसळलं; 62 प्रवाशांच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com