Fairplay Betting App : फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून छापे; 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ED Cracks Down on Fairplay Betting App : ‘वायकॉम १८ नेटवर्क' कंपनीने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे राईट्स होते.
ED Cracks Down on Fairplay Betting App
ED Raid NewsSaamtv
Published On

फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि गुजरातमधील आठ ठिकाणी ईडीने छापे टाकले आलेत. या कारवाईत तब्बल चार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळालीये. आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्तेची किंमत ११७ कोटी एवढी आहे.

ED Cracks Down on Fairplay Betting App
Aamir Khan Deepfake Video: आमिर खान ठरला डिपफेकचा बळी, राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्याने घेतली पोलिसांत धाव

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी २०२३ मध्ये फेअर प्ले ॲपसह आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. याबाबत ईडीकडून तपास सुरू असून मुंबईसह गुजरातमधील कच्छ येथे छापे मारण्यात आले आहेत.

‘वायकॉम १८ नेटवर्क' कंपनीने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे राईट्स होते. मात्र फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आले, असा आरोप आहे.

या ॲपच्या जाहिरातीसाठी ४० कलाकारांनी जाहिरात केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने २०२३ मध्ये रॅपर बादशाहची चौकशी केली होती. तक्रारदार कंपनीने यात आपलं १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसाना झाल्याचा देखील दावा केला आहे.

ED Cracks Down on Fairplay Betting App
Tamannaah Bhatia News : IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com