Indian Student Death x
देश विदेश

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Shocking Incident : अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणाच्या निमित्ताने गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर पार्ट टाइम काम करताना गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

Yash Shirke

  • अमेरिकेतील डलासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या झाली.

  • हैदराबादचा रहिवासी असलेला हा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता.

  • या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Shocking News : अमेरिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमेरिकेतील डलास येथे एका भारतीय विद्यार्थ्याची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा विद्यार्थी बीडीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी तो पेट्रोल पंपावर काम करत असे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा पाहायला मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव पोल चंद्रशेखर असे होते. तो तेलंगणातील हैदराबादमधील एलबी नगर येथील रहिवासी आहे.२५ वर्षीय चंद्रशेखरने हैदराबादमधील एका महाविद्यालयातून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) पदवी मिळवली होती. पुढील शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेतील डलास येथे गेला होता. तो एका पेट्रोल पंपावर पार्ट टाइम काम देखील करत असे.

स्थानिक सूत्रांनुसार, चंद्रशेखर ज्या पेट्रोल पंपावर काम करत होता, त्या पंपावर काही अज्ञात दरोडेखोर घुसले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात चंद्रशेखरच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.

बीआरएसचे आमदार हरीश राव यांनी चंद्रशेखरच्या हैदराबादमधील घराला भेट दिली. त्यांनी तेलंगणा सरकारला परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकन दूतावासाशी समन्वय साधून मृतदेह लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याचे आवाहन केले. मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याने चंद्रशेखर यांचे आईवडील शोकात बुडाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT