
झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट
बँडमधील सदस्याने दिली धक्कादायक माहिती
सिंगापूरमध्ये विषबाधा झाल्याचा खुलासा
Zubeen Garg Death Case : बॉलिवूड गायक झुबीन गर्गच्या मृत्यूनंतर चौकशी सुरु आहे. या प्रकरणात महोत्सवाचे आयोजक, गायकाचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत हे दोन बँड सदस्य यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीदरम्यान शेखर ज्योती गोस्वामी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. झुबीनला सिंगापूरमध्ये विषबाधा झाली होती, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे शेखर यांनी सांगितले.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, झुबिनला सिंगापूरमधील त्याचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानू महंत यांच्यामुळे विषबाधा झाली होती, असा आरोप शेखर ज्योती गोस्वामी यांनी केला आहे.
झुबीन गर्ग एक प्रशिक्षित जलतरणपटू होता. त्याचा मृत्यू बुडून होणे हे शक्य नाही. सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानू महंत यांनी झुबीनला विष दिले होते. कट लपवण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून परदेशातील ठिकाण निवडले. सिद्धार्थने बोटीचा व्हिडीओ कोणासोबत शेअर न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे शेखर ज्योती गोस्वामी यांनी म्हटले.
पोलिसांनी मिळालेल्या कागदपत्रांची सत्यता सीआयडी सूत्रांनी तपासली आहे. झुबीन गर्ग यांचा मृत्यू हा अपघाताप्रमाणे वाटावा असा कट रचण्यात आला होता. सिंगापूरमध्ये झुबिनसोबत राहणाऱ्या सिद्धार्थ शर्मा यांचे वर्तन संशयास्पद होते असे साक्षीदार शेखर ज्योती गोस्वामी यांच्या जबाबातून दिसून आले आहे. सिद्धार्थने जबरदस्तीने चालकाकडून बोटीचा ताबा घेतला. यामुळे बोट समुद्राच्या मध्यभागी थांबली होती, असे त्यात म्हटले आहे.
पाण्यात बुडत असताना झुबीनच्या तोंडातून, नाकातून फेस येत असल्याचे म्हटले जात आहे. बुडताना मदत देण्याऐवजी सिद्धार्थने झुबीनकडे पाहत राहिला. अॅसिड रिफ्लक्स असे म्हणत इतरांनाही झुबीनला मदत करण्यापासून रोखले. झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आता एक सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.