Shakti Cyclone : 100 किमी वेगाने महाराष्ट्राकडं येणाऱ्या शक्ती चक्रीवादळाचं नाव कसं पडलं?

Shakti Cyclone News : शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने मदत, उपाययोजनांची तयारी सुरु केली आहे.
Shakti Cyclone
Shakti Cyclonex
Published On
Summary
  • अरबी समुद्रात निर्माण झालेले शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्र किनारपट्टीकडे सरकत आहे.

  • हवामान विभागाने मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.

  • या चक्रीवादळाला शक्ती हे नाव कसे पडले? जाणून घ्या सविस्तर माहिती

Shakti Cyclone Updates : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मान्सूननंतरच्या हंगामातील हे पहिले चक्रीवादळ असेल. या चक्रीवादळाचा वेग सध्या ताशी १०० किलोमीटरवर पोहोचला आहे. शक्ती चक्रीवादळ वेगाने पश्चिम-नैऋत्येकडे सरकत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर, महाराष्ट्र राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन पथके सक्रीय केली आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये संभाव्य स्थलांतर आणि मदत, उपाययोजनांची तयार सुरु करण्यात आली आहे. कोळी बांधवांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

शक्ती चक्रीवादळाची सद्यस्थिती

हवामान खात्याच्या मते, शक्ती चक्रीवादळ हे आता तीव्र चक्रीवादळात रुपांतरित झाले आहे. शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंत, शक्ती गुजरातच्या द्वारकापासून सुमारे ४२० किमी अंतरावर अरबी समुद्रात केंद्रित होते. हे वादळ ताशी १८ किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. सकाळी ८:३० वाजता, शक्ती चक्रीवादळ २२.०° उत्तर अक्षांश आणि ६४.५° पूर्व रेखांशावर, द्वारकेपासून ४७० किमी पश्चिमेस, नालियापासून ४७० किमी पश्चिम-नैऋत्येस, पाकिस्तानमधील कराचीपासून ४२० किमी नैऋत्येस आणि ओमानमधील मसिराह बेटापासून ६०० किमी ईशान्येस होते. वादळ ५ ऑक्टोबरपर्यंत वायव्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात पोहचून ते ६ ऑक्टोबरपासून ईशान्येकडे वळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Shakti Cyclone
Local Body Election : गावागावात यंदा राजकीय दिवाळी! झेडपी, पंचायत समिती निवडणुकांचा बार दिवाळीतच फुटणार

अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा इतिहास

साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या तुलनेमध्ये अरबी समुद्रात कमी चक्रीवादळे निर्माण होतात. समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे अलिकडच्या काळात अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या हळूहळू वाढत आहे. २०२१ मध्ये तौते आणि २०२३ मध्ये बिप्रजॉय हे अरबी समुद्रात तयार झालेल्या काही प्रमुख वादळांपैकी आहेत.

Shakti Cyclone
Indian Army Chief : यावेळी तुम्हाला नकाशावरून गायब करु, भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

चक्रीवादळाला शक्ती हे नाव का देण्यात आले?

प्रादेशिक चक्रीवादळ नामकरण प्रणालीच्या अंतर्गत चक्रीवादळासाठी 'शक्ती' हे नाव निवडण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ओमान, मालदीव, म्यानमार, थायलंडसह १३ देशांचा समावेश आहे. या देशांकडून चक्रीवादळांच्या नावांची यादी एकत्रित केली जाते. यादीतून नावे क्रमाने वापरली जातात. 'शक्ती' हे नाव श्रीलंकेने सुचवले होते.

Shakti Cyclone
26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com