Pune Crime : दुचाकीला धक्का लागल्यावरुन वाद! तरुणांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Pune : पुणे-अहिल्यानगर मार्गावरील कारेगावच्या हद्दीत किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. याशिवाय दुसऱ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Crime
Pune Crimex
Published On
Summary
  • दुचाकीला धक्का लागल्यावरुन वाद

  • वादाचे रुपांतर हाणामारीत

  • एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-अहिल्यानगर मार्गावर कारेगाव हद्दीत शुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाला आहे. याव्यतिरिक्त आणखी एक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याचेही म्हटले जात आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दोघांनी अटक केली आहे.

कारेगावरच्या हद्दीत दुचाकीला धक्का लागल्यावरुन वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime
Zubeen Garg Death : अपघाताचा बनाव; बॉलिवूड गायकाच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट, सिंगापूरमध्ये विषबाधा झाल्याचा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रांजणगाव परिसरात राहणारे दोन मुस्लीम तरुण हे कामावरुन घरी परतत होते. काम संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी जात असताना ही घटना घडली. दुचाकी कारेगाव हद्दीत पोहोचल्यानंतर त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या वाहनाचा धक्का लागला. या किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाला.

Pune Crime
Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का, बड्या नेत्याने भाजपचे 'कमळ' हाती घेतले

दुचाकीला लागलेल्या धक्क्यावरुन झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या हाणामारीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करत दोन स्थानिक तरुणांना अटक केली. या घटनेचा धार्मिक वादाशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Pune Crime
Shreyas Iyer : लेट आला पण थेट उपकर्णधार झाला! भारताचा भावी Captain ठरला? श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com