INDIAN RAILWAYS NEW MIDDLE BERTH RULES FOR PASSENGERS IN RESERVED COACHES Saam Tv
देश विदेश

Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

Indian Railway New Rule Announced : भारतीय रेल्वेने आरक्षित डब्यातील मधल्या बर्थच्या वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत. आता मधला बर्थ केवळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंतच वापरता येणार आहे. प्रवाशांमधील वाद टाळण्यासाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय.

Alisha Khedekar

  • भारतीय रेल्वेने मधल्या बर्थच्या वापराबाबत नवे नियम लागू केले

  • मधला बर्थ फक्त रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच वापरता येणार

  • प्रवाशांमधील वाद कमी करण्यासाठी रेल्वेचा निर्णय

  • नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी टीटीईंना विशेष अधिकार

प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता रेल्वेने प्रवास करत असाल तर हा महत्त्वाचा निर्णय वाचा. भारतीय रेल्वेने आता रेल्वे प्रवासादरम्यान बर्थवरून होणाऱ्या प्रवाशांच्या वादांवर कठोर भूमिका घेतली आहे. विशेषतः खालच्या आणि मधल्या बर्थच्या वापराबाबत अनेकदा प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत असल्याने रेल्वेने यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या सूचनांनुसार, आरक्षित डब्यांमधील मधला बर्थ दिवसा उघडा ठेवता येणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

जोधपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हितेश यादव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मधल्या बर्थवरून प्रवाशांमध्ये वारंवार वाद होतात. काही प्रवासी दिवसभर मधला बर्थ उघडा ठेवतात, त्यामुळे खालच्या बर्थवर बसणाऱ्या इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.

रेल्वे बोर्डाने यापूर्वी २०१७ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आरक्षित डब्यातील मधला बर्थ केवळ रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंतच उघडता येईल. सकाळी ६ नंतर तो बंद ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाचा उद्देश खालच्या बर्थवरील प्रवाशांना आरामात बसण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. रेल्वे प्रशासनाने या नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार टीटीईंना दिले आहेत.

प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाल्यास टीटीई संबंधित नियम लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतील. रेल्वेच्या या निर्णयाचे अनेक प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेचे नियम जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. माहितीच्या अभावामुळे अनेकदा छोट्या कारणांवरून वाद निर्माण होतात. त्यामुळे आता रेल्वेने स्पष्ट नियम लागू करून प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आरामदायी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT