Railway Tatkal Ticket Rule Change Saam Tv
देश विदेश

Tatkal Ticket: तत्काळ तिकीटाच्या नियमामध्ये मोठा बदल, रेल्वेचा महत्वाचा निर्णय

Railway Tatkal Ticket Rule Change: भारतीय रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तत्काळ तिकीटाच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता ओटीपीशिवाय तत्काल तिकीट मिळणार नाही. वाचा सविस्तर....

Priya More

Summary -

  • भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल केला

  • तक्काळ तिकीटासाठी ओटीपी आधारित प्रणाली लागू करण्यात आली

  • आरक्षण काउंटरवर तिकीट बुक करताना प्रवाशाच्या मोबाइलवर ओटीपी येईल

  • ओटीपी सांगितल्यावर तिकीट जारी केले जाईल

तत्काळ रेल्वे तिकीटांच्या बुकिंगबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तत्काळ रेल्वे तिकिटांच्या बुकिंगमध्ये फसवणुकीच्या सतत तक्रार येत आहेत. या तक्रारी लक्षात घेता तत्काळ तिकीट बुकिंग प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. रेल्वेने तत्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये बदल केला आहे.

रेल्वेने ऑनलाइन तत्काळ तिकीटांसाठी ओटीपी आधारित प्रणाली लागू केली आहे. रेल्वेने जारी केलेल्या नव्या नियमानुसार आता आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट बुक करत असताना प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. प्रवाशाने योग्य ओटीपी काऊंटरवरील कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतरच त्याचे तिकीट बुकिंग होईल. येत्या काही दिवसांत हा नवीन नियम लागू होईल.

रेल्वेने जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन तत्काळ तिकिटांसाठी आधार-आधारित ओळख प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर, ऑक्टोबर २०२५ मध्ये सर्व सामान्य आरक्षणांसाठी बुकिंगच्या पहिल्या दिवशी ओटीपी-आधारित ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली. या दोन्हींनी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुविधा वाढल्या आहेत.

त्यानंतर रेल्वेने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण काउंटरवर तत्काळ तिकिटांसाठी ओटीपी आधारित प्रणालीचा पायलट प्रकल्प सुरू केला होता. आतापर्यंत ही प्रणाली ५२ गाड्यांसाठी लागू करण्यात आली आहे. आता सर्व गाड्यांमध्ये ओटीपी प्रणाली लागू होईल. तत्काळ तिकीट बुकिंगबाबतच्या रेल्वेच्या नव्या नियमामुळे गैरवापर थांबेल. खरंच गरज असलेल्या प्रवशांना तिकीट मिळेल. तसंच, या सुविधेमुळे सामान्य प्रवाशांसाठी तत्काळ बुकिंग आणखी सोपी होण्यास मदत होईल. तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता, प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने हे रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे.

भारतीय रेल्वे गाड्यांसाठी तत्काळ तिकिट बुकिंग तुमच्या प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी सुरू होते. एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी सकाळी ११ वाजता बुकिंग सुरू होते. जर तुम्हाला ६ डिसेंबर रोजी प्रवास करायचा असेल तर एसी क्लाससाठी तात्काळ बुकिंग ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात त्रुटी आढळणे हेच निवडणूक आयोगाचे मोठे फेल्युअर- शशिकांत शिंदे

Shocking : धातूचा मोह जीवावर बेतला; निकामी करण्यासाठी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला अन्...

पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; शितल तेजवानीला अटक|VIDEO

Colon Cancer Diet: कोलन कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा 'या' ६ पदार्थांचा समावेश, अमेरिकन डॉक्टरांनी दिला सल्ला

नाराज रुपाली ठोंबरेंची अजित पवार गटाकडून मनधरणी; राजीनाम्याच्या चर्चेनंतर महत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT