indian pilot smit machchhar news  Saam tv
देश विदेश

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Smit Machhar Flydubai Flight News : दुबई-तेल अवीव फ्लाय दुबई विमानात मोठा थरार! मुंबईच्या स्मित मच्छार यांची कौतुकास्पद कामगिरी. विमान अपघातापासून वाचवला १७४ प्रवाशांचा जीव; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोपटली पाठ. नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Alisha Khedekar

  • फ्लाय दुबई FZ1073 हे दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात घातपाताचा प्रयत्न

  • को पायलटचा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय

  • भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यामुळे वाचले १७४ प्रवाशांचे प्राण

  • मोदी, नेतन्याहू आणि ट्रम्प यांनी मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक केले

दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात बुधवारी मोठा थरार घडला. सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना विमानातून अचानक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर काही क्षणांतच हायजॅकचा इशारा देणारा कोडही पाठवण्यात आला. त्यामुळे विमानाचे अपहरण झाल्याची भीती निर्माण झाली आणि इस्रायलमध्येही सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली.मात्र विमानात काही घडलं वेगळंच.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते. सुरुवातीला विमानाने ‘७७००’ हा आंतरराष्ट्रीय आपत्कालीन कोड पाठवला. त्यानंतर ‘७५००’ हा विमान हायजॅकचा इशारा देणारा कोड पाठवण्यात आला. हा संदेश मिळताच इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन लढाऊ विमाने आकाशात तैनात केली. दरम्यान, विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि ते पुन्हा सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आले. अखेर विमान सौदी अरेबियात सुखरूप उतरले.

या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयात सुरक्षेशी संबंधित तातडीची बैठकही घेण्यात आली. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेत मुंबईचे पायलट स्मित मच्छार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान आपत्कालीन संदेश पाठवला गेल्याची माहिती समोर आली आहे. या झटापटीत स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचेही सांगितले जात आहे.

गंभीर परिस्थितीतही स्मित मच्छार यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी कॉकपिटचा दरवाजा अनलॉक केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विमानातील इतर व्यक्तींना कॉकपिटमध्ये घडलेला प्रकार समजला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली. स्मित मच्छार यांच्या या धाडसी कृतीमुळे विमानातील १७४ प्रवाशांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या धाडसाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

SCROLL FOR NEXT