Shubhanshu Shukla Saam Tv
देश विदेश

Shubhanshu Shukla Return Update : अंतराळवीर शुभांशु शुक्लाची घर वापसी; अ‍ॅक्सिओम-४ लवकरच भारतात परतणार, नासाने दिली माहिती

Shubhanshu Shukla : भारताचे सुपुत्र कॅप्टन शुभांशू शुक्ला आज अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेनंतर आयएसएसवरून पृथ्वीवर परत येणार आहेत. त्यांच्या टीमचा स्प्लॅशडाउन १५ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ होणार आहे.

Alisha Khedekar

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) परतीचा प्रवास सुरु झाला आहे. शुभांशू शुक्ला काही तासांत अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत त्यांच्यासोबत गेलेल्या इतर तीन अंतराळवीरांसह पृथ्वीवर येणार आहेत. ही चार सदस्यांची टीम आज संध्याकाळी आयएसएसवरून रवाना होईल आणि पृथ्वीवर परतण्याचा त्यांचा प्रवास सुरू करेल.

अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि अ‍ॅक्सिओम स्पेसने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, ड्रॅगन कॅप्सूलचा हॅच सोमवारी दुपारी २:५० वाजता बंद करण्यात आला. त्यानंतर ४:३५ वाजता कॅप्सूल आयएसएसमधून बाहेर पडेल. तिथून हे ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि नंतर १५ जुलै, मंगळवार रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ स्प्लॅशडाउन होण्याची शक्यता नासा ने वर्तवली आहे.

भारताचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की स्प्लॅशडाउन म्हणजेच पृथ्वीवर परतण्याची वेळ १५ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता निश्चित करण्यात आली आहे. हे परतीचे क्षण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पाहता येणार आहेत.

२५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून अ‍ॅक्सिओम-४ मोहीम प्रक्षेपित करण्यात आली आणि २८ तासांच्या प्रवासानंतर २६ जून रोजी आयएसएसमध्ये यशस्वीरित्या डॉक करण्यात आली. या मोहिमेदरम्यान बायोमेडिकल सायन्स, प्रगत साहित्य, न्यूरोसायन्स, शेती आणि अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित ६० हून अधिक प्रयोग करण्यात आले, जे अ‍ॅक्सिओम स्पेसच्या कोणत्याही खाजगी अंतराळवीर मोहिमेतील आतापर्यंतची सर्वात मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे.दरम्यान आता अवघ्या भारताचे लक्ष शुभांशु शुक्ला यांच्या घर वापसीकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Banned: 'या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

Maharashtra Live Update: शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

Matheran Traffic : सुट्टीचा आनंद कमी, मनस्तापच जास्त! माथेरान घाटात वाहतूक खोळंबा, पर्यटक लटकले

SCROLL FOR NEXT