Indian Army Saam Digital
देश विदेश

Indian Army Recruitment 2024: भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, लवकर करा अर्ज; मिळेल 2 लाखांपेक्षा जास्त पगार

Government Job: भारतीय सैन्य दलामध्ये 140 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC-140) भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Priya More

भारतीय लष्करामध्ये (Indian Army) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली असेल आणि भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय सैन्य दलामध्ये 140 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC-140) भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज भरण्याची तारीख -

भारतीय लष्कराच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. या 30 पदांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांवर अर्ज करण्याची इच्छा असणारे उमेदवार 9 मे किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

या पदांसाठी होणार भरती -

सिव्हिल- 7 पदे

कम्प्युटर सायन्स - 7 पदे

इलेक्ट्रिकल- 3 पदे

इलेक्ट्रॉनिक्स- 4 पदे

मेकॅनिकल- 7 पदे

विविध इंजिनिअरिंग स्ट्रीम- 2 पदे

वयोमर्यादा -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा ठरवून दिली आहे. भारतीय सैन्य भरती 2024 अंतर्गत अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असावी.

शिक्षण -

भारतीय सैन्य दलाने दिलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असावी.

इतका मिळेल पगार -

- लेफ्टनंट - 56,100 ते 1,77,500 रुपये

- कॅप्टन - 61,300 ते 1,93,900 रुपये

- मेजर - 69,400 ते 2,07,200 रुपये

- लेफ्टनंट कर्नल - 1,21,200 ते 2,12,400 रुपये

- कर्नल - 1,30,600 ते 2,15,900 रुपये

- ब्रिगेडियर - 1,39,600 ते 2,17,600 रुपये

- मेजर जनरल - 1,44,200 ते 2,18,200 रुपये

- लेफ्टनंट जनरल एचएजी स्केल - 1,82,200 ते 2,24,100 रुपये

- लेफ्टनंट जनरल HAG + स्केल - 2,05,400 ते 2,24,400 रुपये

- VCOAS/आर्मी Cdr/लेफ्टनंट जनरल (NFSG) - 2,25,000 रुपये

- COAS - 2,25,000 रुपये

अशी केली जाईल निवड -

SSB मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी, निवडक केंद्रांपैकी एकावर कटऑफ टक्केवारीच्या आधारे निवडलेल्या पात्र उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

Skin Care: रोज चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय होते?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हॉटेल अन् ढाब्यासारखं घरीच झटपट बनवा झणझणीत ‘पनीर खिमा मसाला’

निवडणुकीनंतर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट|VIDEO

SCROLL FOR NEXT