लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने शुक्रवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सपाने कौशांबी आणि कुशीनगरमधून नावे जाहीर केली आहेत. कौशांबीमधून पुष्पेंद्र सरोज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजय प्रताप सिंह उर्फ पिंटू सैंतवार यांना कुशीनगरमधून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपने कुशीनगरमधून विजयकुमार दुबे आणि कौशांबी विनोद सोनकर यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने अद्याप दोन्ही जागांवर नाव जाहीर केलेले नाही. कौशांबीमधून सपाकडून अनेक नावांच्या चर्चेसोबतच अखिलेश यादव राजा भैय्यासाठी ही जागा सोडू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात होती.
मात्र पुष्पेंद्र सरोज यांना मैदानात उतरवल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुष्पेंद्र सरोज यांचे वडील इंद्रजित सरोज हे उत्तर प्रदेश आणि केंद्रात मंत्री राहिले आहेत.
यातच कुशीनगरमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्या नावाची चर्चा सुरू होती. स्वामी प्रसाद मौर्य आता पुन्हा अखिलेश यादव यांच्या जवळ येत असल्याचे बोलले जात होते. मात्र आज अजय प्रताप यांच्या नावाची घोषणा झाल्याने याही चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस 80 पैकी 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपा आणि त्यांचे मित्रपक्ष इतर 63 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. मात्र राज्यात मुख्य लढत ही सांजवाडी पक्ष आणि भाजपमध्ये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.