Bhiwandi Lok Sabha: महायुतीचं टेन्शन 'खल्लास'; श्रीकांत शिंदे, चव्हाणांसोबतच्या बैठकीनंतर भिवंडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर

Shrikant Shinde News: भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
महायुतीचं टेन्शन 'खल्लास'; श्रीकांत शिंदे, चव्हाणांसोबतच्या बैठकीनंतर भिवंडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर
Shrikant Shinde And Ravindra ChavanSaam Tv
Published On

Shrikant Shinde And Ravindra Chavan:

>> अभिजित देशमुख, कल्याण

भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पदाधिकार्यांचे गैरसमज दूर करत समजूत काढण्यात आली असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली.

महायुतीचं टेन्शन 'खल्लास'; श्रीकांत शिंदे, चव्हाणांसोबतच्या बैठकीनंतर भिवंडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर
Prakash Ambedkar : भाजपसोबत महाविकास आघाडीनं 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

या पार्श्वभूमीवर आज आज डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी लोकसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मागील काही दिवसात झालेले गैरसमज दूर करण्यात आले. यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.

भविष्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीही गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

महायुतीचं टेन्शन 'खल्लास'; श्रीकांत शिंदे, चव्हाणांसोबतच्या बैठकीनंतर भिवंडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर
Maharashtra Election: महायुतीतील जागावाटप दोन-तीन दिवसात मार्गी लागेल; खासदार श्रीकांत शिंदे

तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समज गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com