अभिजीत देशमुख साम टीव्ही, कल्याण
लोकसभा निवडणुका (Maharashtra Elction) काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसत आहे. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी महायुतीत जागेचा तिढा जास्त राहिलेला नाही, दोन दिवसात सगळ्या गोष्टी मार्गी लागतील, असं सांगितलं आहे.
पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी येत्या दोन दिवसात भाजपा ,शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या जागा जाहीर (Mahayuti Seat Sharing) होतील. राज्यात 45 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल आणि पुन्हा एकदा मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल, असं सांगितलं आहे.
महायुतीच्या अजून सहा जागांचा पेच सुटलेला दिसत (Shrikant Shinde On Mahayuti Seat Sharing) नाही. विदर्भामध्ये 19 एप्रिल रोजी मतदान आहे. निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. परंतु महायुतीतील जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. यावर आता श्रीकांत खासदार शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे.
अजून नाशिक, ठाणे, सातारा, संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सहा मतदारसंघांचे जागावाटप रखडलेले (Maharshtra Politics) आहे. लवकरच या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं शिंदे यांनी सा्ंगितलं आहे. काही जागांवर भाजप तर काही जागेवर शिवसेना आपला दावा सांगत आहे.
नाशिक, ठाणे, सातारा, संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांची निवडणूक शेवटच्या टप्प्यांमध्ये पार पडणार (Lok Sabha Election 2024) आहे. लवकरच या मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली (Lok Sabha Election) आहे. महायुतीतील जागावाटप दोन-तीन दिवसात मार्गी लागेल, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.