Kolhapur Election : कोल्हापुरातील कॉलेजमध्ये लोकसभा उमेदवाराचा प्रचार; प्राचार्यांना भाजप कार्यकर्त्यांनी धरलं धारेवर

Candidate promotion in college : व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की ७ ते ८ भाजप कार्यकर्त्ये प्राचार्यांच्या दालनात उभे आहेत. तसेच कॉलेजमधील या प्रकारांवरून तक्रार दाखल करणार असल्याचे बोलत आहेत.
Kolhapur Election
Kolhapur ElectionSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Lok Sabha Election 2024 :

कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील एका कॉलेजमध्ये लोकसभा उमेदवाराचा प्रचार सुरु होता. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. सदर घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Kolhapur Election
Madha Lok Sabha: माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लोकसभेला उमेदवारी जाहीर झालेल्या एका विशेष उमेदवाराचा प्रचार कॉलेजमध्ये सुरू होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एक फॉर्म देण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी प्राचार्यांची भेट घेतली.

या प्रकरणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की ७ ते ८ भाजप कार्यकर्त्ये प्राचार्यांच्या दालनात उभे आहेत. तसेच कॉलेजमधील या प्रकारावरून तक्रार दाखल करणार असल्याचे बोलत आहेत. सदर घटनेमुळे भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत.

प्राचार्य व्ही.एम पाटील यांनी असा कोणताही प्रकार कॉलेजच्या वतीने करण्यात आला नसून या संदर्भात द प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेला विचारा अशी विनंती केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट संस्थेच्या कार्यालयात पोहोचले.

यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर के.जी.पाटील यांनाच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. तसेच या संदर्भातला जाब विचारला. अशा पद्धतीने फॉर्म देऊन प्रचार करण्यास भाग पाडणाऱ्या त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

सरकार आमचं आहे, जर अशा पद्धतीने तुम्ही कारवाई केली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असा दम ही भाजप पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या चेअरमन के.जी.पाटील यांना भरला.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रचार आणि सभा घेत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला फक्त एक आठवडा शिल्लक आहे. त्यात आता कोल्हापूरमधील कॉलेजमध्ये अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Kolhapur Election
Kolhapur Crime News : कुप्रसिद्ध टाेळीच्या म्हाेरक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून 12 गुन्हेगार हद्दपार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com