Kolhapur Crime News : कुप्रसिद्ध टाेळीच्या म्हाेरक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून 12 गुन्हेगार हद्दपार

जुना राजवाडा पोलिसांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
kolhapur police banned vijay patil and 12 from district
kolhapur police banned vijay patil and 12 from districtsaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस आणि प्रशासन सतर्क आहे. बेकायदेशिर काम करणा-यांवर जरब बसावी यासाठी प्रशासन ठाेस निर्णय घेत आहे. त्यातूनच कोल्हापूर शहर आणि परिसरात मटका जुगार अड्डे चालवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणारा मटका व्यवसायाचा मालक विजय पाटील याच्यासह टोळीतील बारा जणांवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. (Maharashtra News)

विजय पाटील सह टोळीतील बारा जणांवर एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. जुना राजवाडा पोलिसांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

kolhapur police banned vijay patil and 12 from district
Nashik : तब्बल 12 दिवसांनंतर नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावास प्रारंभ, जाणून घ्या दर

काेल्हापूर पाेलिस यांच्याकडून बेकायदेशिर मद्य विक्री करणा-यांवर देखील लक्ष ठेवले जात आहे. समाज माध्यमातील आक्षेर्पाह पाेस्ट देखील प्रशासन तपासत असून त्याकडे पाेलिसांकडे तपासासाठी वर्ग केल्या जाताहेत. एकंदरीतच निवडणुकीला काेणतेही गालबाेट लागू नये यासाठी पाेलिस प्रयत्नशिल आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

kolhapur police banned vijay patil and 12 from district
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com