Bengaluru School Bomb Threat: बेंगळुरूतील 44 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, ५,००० मुलांना शाळेतून काढले बाहेर

Bengaluru School Bomb Threat: बेंगळुरूतील १५ शाळांना शुक्रवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी दिल्यानंतर तब्बल ५ हजार मुलांना शाळेतून तात्काळ बाहेर काढण्यात आले.
Bengaluru School Bomb Threat
Bengaluru School Bomb ThreatSaam Digital

Bengaluru School Bomb Threat

बेंगळुरूतील 44 शाळांना शुक्रवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी दिल्यानंतर तब्बल ५ हजार मुलांना शाळेतून तात्काळ बाहेर काढण्यात आले. बेंगळुरूचे पोलीस आणि बॉम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बचा शोध घेण्यात येत आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये अनेक शाळांना धमक्या दिल्या होत्या त्याचप्रमाणे शुक्रवारीही ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. धमकीचे मेल विविध पत्त्यांवरून पाठवण्यात आले आहेत. नीव, क्ले, विद्याशिल्प या काही शाळांमध्ये सध्या तपासणी सुरू आहे.

शुक्रवारी पाठवलेले ईमेल मूळ आयपी अॅड्रेसवरून विविध पत्त्यांवर पाठवण्यात आले आहेत. तब्बल 44 शाळांना हे धमकीचे मेल आले आहे. या शाळांमध्ये ५००० विद्यार्थी आहेत. दरम्यान धमकी मिळाल्यानंतर तातडीने या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढून घरी पाठवण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bengaluru School Bomb Threat
Odisha Major Accident : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या व्हॅनला मंदिराजवळच अपघात; ८ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

एका अनपेक्षित संकटाचा सामना आम्ही आज करत आहोत. अज्ञाताकडून घातपाताची धमकी देण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. बॉम्ब शोधक पथकाच्या सूचनेनंतर मुलांना घरी पाठवण्यात आले आहे, असे नीव शाळेच्या प्रशासनाने सांगितले.

Bengaluru School Bomb Threat
Air Pollution: वायू प्रदुषणामुळे भारतात दरवर्षी २१ लाख लोकांचा मृत्यू; संशोधनातून खळबळजनक माहिती उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com