Air Pollution: वायू प्रदुषणामुळे भारतात दरवर्षी २१ लाख लोकांचा मृत्यू; संशोधनातून खळबळजनक माहिती उघड

India Air Pollution Death: वायू प्रदुषणामुळे दरवर्षी भारतात जवळपास २१ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. एका संशोधन अहवालातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Air pollution kills 2.1 million people in India every year Shocking information from the research
Air pollution kills 2.1 million people in India every year Shocking information from the researchSaam TV
Published On

India Air Pollution Death Statistics

गेल्या काही दिवसांपासून देशात हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली आहे. राजधानी दिल्लीत वायूप्रदुषामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. मुंबईतही दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता बिघडत चालली आहे. वायू प्रदुषण रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पाऊलं उचलण्यात येत आहे. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Air pollution kills 2.1 million people in India every year Shocking information from the research
Gas Cylinder Price: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलिंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले

वायू प्रदुषणामुळे दरवर्षी भारतात जवळपास २१ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. एका संशोधन अहवालातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ झाली असून हवेचं प्रदूषण नेमकं कसं कमी करता येईल, यावर संशोधनाची गरज आहे.

वायू प्रदूषणाच्या अभ्यासानुसार, देशात दरवर्षी प्रदूषणामुळे २.१८ मिलियन म्हणजेच २१ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. वायू प्रदुषणामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक आहे. चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या अभ्यासासाठी नवीन मॉडेल राबविण्यात आले होते. प्रदूषणाच्या या कारणांमध्ये जवळपास सर्व बाह्य स्रोतांचा समावेश होता. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्युमध्ये ५२ टक्के मृत्यू हृदयविकाराचे आजार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि मधुमेह यासारख्या सामान्य परिस्थितींशी संबंधित आहेत.

याशिवाय २० टक्के मृत्यू प्रकरणे उच्च रक्तदाब, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांशी संबंधित आहेत. दरम्यान, उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ५१ लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतात, असंही अभ्यासातून समोर आलं आहे.

Air pollution kills 2.1 million people in India every year Shocking information from the research
IMD Rain Alert: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; अवकाळीबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com