Gas Cylinder Price: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलिंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले

Gas Cylinder Price Hike: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Gas Cylinder Price 1 December 2023
Gas Cylinder Price 1 December 2023 Saam Tv
Published On

Gas Cylinder Price 1 December 2023

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २१ रुपयांनी वाढवले आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gas Cylinder Price 1 December 2023
Rashi Bhavishya: डिसेंबरच्या सुरुवातीलाच जुळून आला खास योग; या राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार

यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Price)  दरात तब्बल १०१.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १७४९ रुपये इतके झाले आहेत. (Latest Marathi News)

घरगुती गॅस सिलिंडर दर किती?

दुसरीकडे घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांची कपात केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही.

आता डिसेंबरमध्येही घरगुती गॅससिलिंडरच्या किंमती जुन्याच दरांवर कायम आहे. मुंबईत गॅस सिलिंडरचे दर ९०२.५० रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे. तर उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरचा दर ७०३ रुपये इतका आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर दर किती?

दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७७५.५० रुपयांवरून १७९६.५० रुपयांवर आली आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७२८ रुपयांवरून १७४९ रुपयांवर पोहोचली आहे. तर कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली असून किंमत १८८५.५० रुपयांवरून १९०८ रुपयांपर्यंत वाढली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्वाधिक २६.५ रुपयांनी वाढ झाली आहे.

Gas Cylinder Price 1 December 2023
Shocking News: खळबळजनक! खोकल्याचे औषध घेतल्याने ५ जणांनी गमावला जीव; दोघांची प्रकृती गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com