s400 sudarshan chakra x
देश विदेश

India Vs Pakistan : भारताचं 'सुदर्शन चक्र' फिरलं, पाकड्यांची चाल एका झटक्यात परतवली

Ind Vs Pak S 400 : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील १५ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एस-४०० (सुदर्शन चक्र) या प्रणालीने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्र नष्ट केली.

Yash Shirke

Operation Sindoor नंतर पाकिस्तानने १५ भारतीय ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण भारताच्या सुदर्शन चक्रासमोर त्यांची सर्व क्षेपणास्त्रे अपयशी ठरली आहेत. आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानाचा सामना करावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारतातील श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंडीगड, नल, फलौदी, उत्तरलाई, अवंतीपुरा आणि भुजसहीत उत्तर आणि पश्चिमी भागात क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

पाकिस्तानने केलेला एकही हल्ला यशस्वी झाला नाही. भारताच्या एस-४०० (सुदर्शन चक्र) या प्रणालीने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे निष्क्रिय केली आहेत. पाकिस्तानने रात्री उशिरा भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेपणास्त्रे हल्ल्याद्वारे भारताचे मोठे नुकसान करण्याचा पाकिस्तानचा प्लान होता. पण त्याचा हा प्लान फसला.

२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या २६ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी देखील झाले होते. या हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ९ ठाणी धुळीस मिळवली.

७ मे रोजी पहाटेच्या सुमारास भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ अड्डे भारताने नष्ट केले. यातील ४ अड्डे पाकिस्तानमध्ये तर ५ अड्डे पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांशी संबंधित १०० पेक्षा जास्त दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT