Driving license negative points 
देश विदेश

मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्सवर नंबर सिस्टम, निगेटिव्ह पॉईंट्स वाढले तर DL रद्द होणार, जाणून घ्या नवा नियम

Driving license suspension : वाहतूक नियम तोडल्यास आता ड्रायव्हिंग लायसन्सवर निगेटिव्ह पॉईंट्स जमा होतील. मर्यादा ओलांडल्यास लायसन्स निलंबित किंवा रद्द होणार, नव्या नियमांची माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

New Traffic Rules India : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात सराकारकडून आता कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने आता निगेटिव्ह नंबर सिस्टम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले तर लायसन्सवर निगेटिव्ह गुण नोंदवले जातील. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त गुण जमा झाले, तर लायसन्स निलंबित केले जातील अथवा लायसन्स रद्द होऊ शकते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून दोन महिन्यात हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. रस्ते अपघात कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, त्यासाठी सरकारने हा नवा नियम आणला आहे.

नव्या सिस्टमनुसार, सिग्नल तोडणे आणि मर्यादापेक्षा वेगाने गाडी चालवणे यासारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जर ड्रायव्हिंग लायसन्सवर मर्यादापेक्षा जास्त नकारात्मक (निगेटिव्ह) गुण जमा होतील, त्या वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाईल अथवा कायमचे रद्द करण्यात येणार आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून पुढील दोन महिन्यात नवा नियम लागू केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतात दरवर्षी सुमारे १.७ लाख रस्ते अपघात होतात. या अपघातात हजारो लोकांचा बळी जातो. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेफाम वाहन चालवण्यामुळे देशात दररोज अनेक अपघात होतात. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड आणि ई-चलन यासारख्या उपाययोजना आहेत. पण अपघात कमी झाले नाहीत. अपघाताची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने कठोर नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांचा प्रस्ताव विचारधीन आहे, दोन महिन्यात लागू होऊ शकतो.

वाहतुकीचा नवा नियम कसा असेल?

नव्या नियमांनुसार, वेगमर्यादा ओलांडणे, सिग्नल तोडणे, बेफामपणे वाहन चालवणे यासारख्या उल्लंघनांसाठी ड्रायव्हरला नकारात्मक गुण दिले जातील. तीन वर्षांत 12 गुण जमा झाल्यास लायसन्स एक वर्षासाठी निलंबित होईल. निलंबनानंतर पुन्हा 12 गुण जमा झाल्यास लायसन्स पाच वर्षांसाठी रद्द होईल. याउलट, चांगल्या वाहनचालकांना बक्षीस म्हणून काही गुण मिळू शकतील, ज्यामुळे त्यांचे रेकॉर्ड सुधारेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT