India Pakistan Tension Saam tv
देश विदेश

India Pakistan Tension : पाकिस्तानची झोप उडणार; भारताने घेतला आणखी एक मोठा निर्णय, वाचा

India Pakistan Tension News : पाकिस्तानची झोप उडवणारा निर्णय भारताने घेतला आहे. डिजिटल स्ट्राइकदरम्यान भारताने महत्वाचा निर्णय घेतलाय.

Vishal Gangurde

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतात तणाव वाढला आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरु असताना भारताने शॉर्ट रेंज डिफेंस मिसाइल सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीमुळे भारताची एअर डिफेन्स सिस्टम आणकी मजबूत होणार आहे. भारतीय सैन्य दलाच्या शत्रूचे विमान, हेलिकॉप्टर, ड्रोनवर हल्ला करण्यासाठी नेक्स्ट जनरेशनचा शॉर्ट रेंज एअर डिफेंस सिस्टम्स खरेदी करण्याची प्रकिया सुरु केली आहे.

भारताच्या सैन्य दलासाठी नवीन एअर डिफेंस सिस्टम खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने निविदा जारी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने निविदेसाठी शेवटची तारीख २० मे २०२५ ठेवली आहे. रक्षा मंत्रालयाने ४८ लाँचर, ४८ नाइट व्हिजन साइट, ८५ मिसाइल, १ मिसाइल टेस्टिंग स्टेशन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव जारी केला आहे.

डिफेन्स मिसाइल स्टिस्टमध्ये २४ तासांत शत्रूंचे विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन पाडण्याची क्षमचा आहे. हाय एल्टीट्यूड एरिया, वाळवंट, समुद्र किनारी भागात मिसाइल सिस्टम काम करेल. या सिस्टमची संपूर्ण खरेदी 'मेक इन इंडिया' अंतर्गत होईल.

शॉर्ट रेंज एअर डिफेंस सिस्टमची वैशिष्ट्ये काय?

शॉर्ट रेंज एअर डिफेंस हा एक एअर डिफेंस सिस्टमचा प्रकार आहे. कमी उंचीवर असलेल्या धोकादायक ड्रोनला पाडण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. या सिस्टमचा उपयोग दहशतवादी विरोधी ऑपरेशनसाठी वापर केला जातो. कमी उंचीवर उडणाऱ्या धोकादायक ड्रोनवर सिस्टमद्वारे हल्ला करता येऊ शकतो. ही सिस्टम सीमा सुरक्षासाठी महत्वपूर्ण आहे.

दरम्यान, पाकिस्तानने अब्दाली बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केल्याचा दावा केलाय. पाकिस्तानने चाचणी केलेल्या मिसाइलची क्षमता ४५० किलोमीटर इतकी आहे. पाकिस्तानच्या दाव्यामुळे आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT