pakistani terrorist killed  Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor: भारताच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची संपूर्ण यादी

India Pakistan War: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानाताली ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले होते.

Priya More

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या पहलगाममध्ये हल्ला करत २८ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यानंतर १५ व्या दिवशी भारताने बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अनेक दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांची यादी समोर आली आहे. भारताने पाकिस्तानच्या कोणकोणत्या दहशतवाद्यांचा खात्मा केला हे आपण पाहणार आहोत...

७ मे रोजी भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक केला होता. या एअर स्ट्राईकमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जण ठार झाले होते. या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं समोर आली आहेत. या मध्ये लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनेंच्या कमांडर आणि प्रमुखांचा समावेश होता.

ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं -

१) मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल, लष्कर-ए-तोएबा संघटना- त्याची अंत्ययात्रा एका सरकारी शाळेत पार पडली. ज्याचे नेतृत्व जमात-ए-उद-दावाचा हाफिज अब्दुल रौफ (जागतिक दहशतवादी म्हणून घोषित) करत होता.

२) हाफिज मोहम्मद जमील, जैश-ए-मोहम्मद संघटना - तो मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा आहे.

३) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​घोसीसाहब, जैश-ए-मोहम्मद संघटना - तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता.

४) खालिद उर्फ ​​अबू आकाशा, लष्कर-ए-तोएबा - तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याचे अंत्यसंस्कार फैसलाबाद येथे झाले आणि यावेळी वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

५) मोहम्मद हसन खान, जैश-ए-मोहम्मद संघटना - तो पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचे ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरीचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT