India Pakistan War Saam Tv
देश विदेश

India Pakistan War: पाकिस्तान जिथून ड्रोन टाकत होता, तेच दहशतवादी लाँच पॅड भारताकडून उद्ध्वस्त, पाहा VIDEO

India Strikes Terror: भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तान जिथून ड्रोन आणि मिसाईल हल्ला करत होता ते दहशतवादी लाँच पॅड भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Priya More

पहलगाम हल्ल्याचा बदला अखेर भारताने घेतला. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. त्यानंतर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरू झाल्या. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तान भारताच्या दिशेने वारंवार गोळीबार, ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्राने हल्ले करत आहे. भारतीय सैन्य देखील या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भारताने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवाद्यांचे लाँच पॅड नष्ट केले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

भारतीय लष्कराने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. याठिकाणावरून पाकिस्तानकडून ट्यूब लाँच ड्रोन डागले जात होते. संरक्षण सूत्रांचा हवाला देत एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, 'लष्कराच्या या अचूक कारवाईत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यांचे मूळ लक्ष्य करण्यात आले. लष्कराने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले. लष्कराने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे ज्यामध्ये हे तळ उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या हल्ल्याला भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताच्या सैन्यांकडून हवेतच पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडले जात आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतावर फतेह-२ क्षेपणास्त्र डागले होते. या क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पण पाकड्यांचे हे क्षेपणास्त्र सैन्यांनी पाडले. हरियाणातील सिरसा येथे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टळला.

पाकिस्तानकडून भारतातील सीमेलगतच्या अनेक शहरांवर सतत हल्ले केले जात आहेत. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले . जम्मू-श्रीनगर ते पठाणकोट आणि पोखरणपर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ले केले. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतावर २६ ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले. पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानमधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT