Operation Sindoor saam tv
देश विदेश

Operation Sindoor: भारताची ५ लढाऊ विमाने पाडली; पाकिस्तानचा खोटा दावा, पोलखोल झाली

India airstrike on Pakistan: भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानने भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा दावा केला. भारताने हा दावा फेटाळत ISI चा दुष्प्रचार उघड केला.

Namdeo Kumbhar

Pakistan fake claim 5 Indian jets downed : भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील ९० ते १०० दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. पण पाकिस्तानकडून खोटे दावे केले जात आहेत. भारताचे पाच लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानकडून खोटा अन् पोकळ दावा केला जातोय. पाकिस्तानने केलेला दावा खोटा असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आलेय.

भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ला करत बदला घेतला. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता, त्यामध्ये २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. या भ्याड हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. भारतीय संरक्षण मंत्रालयाने ही कारवाई मर्यादित, अचूक आणि गैर-आक्रमक असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी ठिकाणांना लक्ष्य केले गेले नसल्याचेही भारताकडून स्पष्ट केलेय.

भारतीय वायुसेनेने राफेलसह स्काल्प आणि हॅमर मिसाईल्सचा वापर करत बहरवळपूर,मुरिदके आणि सियालकोटसह पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हल्ले केले. या कारवाईत ९० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर या मोहिमेचे निरीक्षण केले. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी चर्चा केली.

पाकिस्तानने भारताचे तीन राफेल, एक सुखोई-३० आणि एक मिग-२९ विमाने पाडल्याचा दावा केला. पण भारताने हा दावा खोटा असल्याचा सांगितलेय. भारताने पाकिस्तानचा खोटा असल्याचे सांगितलेच, त्याशिवाय आयएसआयचा दुष्प्रचार असल्याचे सिद्ध केले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्टचेकने पाकिस्तानने शेअर केलेले व्हिडिओ २०२४ च्या खैबर पख्तुनख्वातील सांप्रदायिक हिंसाचाराचे असल्याचे उघड केले.

पाकिस्तानच्या या खोट्या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वासार्हता कमी केली. भारताने आपली कारवाई दहशतवादविरोधी असल्याचे ठामपणे सांगितलेय. युनायटेड नेशन्स आणि अमेरिकेसह अनेक देशांनी दोन्ही राष्ट्रांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादी संघटनांना धडा शिकवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT