Operation Sindoor Air Strike
Operation Sindoor Air Strike Saam Tv News

Operation Sindoor : कुंकवाचा करंडा त्यात कुंकू, पहलगाम हल्ल्याचा बदला; 'ऑपरेशन सिंदूर' नावामागं कारण काय?

Operation Sindoor Air Strike : भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. सिंदूर हे नाव निवडण्यामागचे कारण आता समोर आले आहे. सिंदूर म्हणजे विवाहित स्त्रियांचे प्रतिक आहे.
Published on

नवी दिल्ली : बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकला (Air Strike) 'Operation Sindoor' असं नाव देण्यात आलं. या कारवाईत दहशतवाद्यांचे ९ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात नवविवाहित जोडप्यांना लक्ष्य केलं होतं. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन होतं. 'सिंदूर' हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचं प्रतीक आहे. तसेच, योद्ध्यांसाठीही ते गौरवाचं चिन्ह आहे. भारतीय लष्कराने या कारवाईची घोषणा करताना 'ऑपरेशन सिंदूर' नावाचं महत्त्व सांगितलं.

ऑपरेशन सिंदूर नाव का निवडलं? (Why India Choose Operation Sindoor Name)

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. त्याला ऑपरेशन 'सिंदूर' नाव दिलं. सिंदूर हे नाव निवडण्यामागचे कारण आता समोर आले आहे. सिंदूर म्हणजे विवाहित स्त्रियांचे प्रतिक आहे. तसेच सिंदूर हे यौद्ध्यांसाठी गौरवाचे प्रतिक आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर या नावाने ही कारवाई केली आहे.

Operation Sindoor Air Strike
Operation Sindoor : 'काश मैं भी मारा जाता', ऑपरेशन सिंदूरनं कुटुंब बेचिराख केलं; दहशतवादी मसूद अझहर ढसाढसा रडला

पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना मारले होते. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन मारले होते. त्यांनी गोळ्या झाडून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवालदेखील शहीद झाले. लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांतच विनय यांचे निधन झाले. या घटनेनंतर हिमांशीचे सौभाग्य तिच्याकडून हिरावून घेतले. यामुळे संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. त्यामुळे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव निवडलं.

पहलगाममधील अनेक हिंदू महिलांच्या पतींना गोळ्या झाडून मारण्यात आलं. विवाहित महिलांना आपला पती गमवावा लागला. त्यांच्या पतीच्या अस्तित्वाचे आणि संरक्षणाचे प्रतिक म्हणजे सिंदूर आहे. त्यामुळेच या ऑपरेशनला हे नाव देण्यात आले आहे.

Operation Sindoor Air Strike
Operation Sindoor : अभिमानास्पद क्षण! पहलगामचा बदला घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com