Online Gaming Bill x
देश विदेश

Dream 11 गेमिंग ॲपची सेवा बंद! ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; VIDEO

Online Gaming Bill 2025 : संसदेमध्ये ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. यामुळे ड्रीम ११ ॲपसह पोकरबाजी आणि मोबाइल प्रीमियर लीग सारख्या ॲपची सेवा बंद झाली आहे.

Yash Shirke

  • ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याने ड्रीम ११, पोकरबाजी व एमपीएल सारख्या ॲप्सची सेवा बंद.

  • रिअल मनी गेम्सवर बंदीमुळे गेमिंग उद्योग आणि गुंतवणूकदारांना मोठा धक्का.

  • कंपन्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली.

Dream 11 गेमिंग ॲपची सेवा बंद करण्यात आली आहे. आता कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाही. ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणल्याचे म्हटले जात आहे.

गुरुवारी (२१ ऑगस्ट) संसदेने बंदी घातल्यानंतर भारतातील काही आघाडीच्या मोबाइल गेमिंग ॲप्सनी रिअल-मनी गेम्स बंद केले आहेत. यामुळे २०२९ पर्यंत ३.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असलेल्या गेमिंग विश्वाचे भविष्य धोक्यात आले आहे. ऑनलाइन रिअल मनी गेम्स, संबंधित जाहिराती आणि पेमेंट सेवांवर अचानक बंदी घातल्याने टायगर ग्लोबल आणि पीक एक्सव्ही पार्टनर्स यांसारख्या गुंतवणूकदारांनी पाठिंबा दिलेल्या उद्योगाला धक्का बसला आहे.

ड्रीम ११, पोकरबाजी आणि मोबाइल प्रीमियर लीग सारख्या लोकप्रिय ॲप्सनी त्यांच्या रिअल-मनी ऑफरिंग सेवा थांबवल्या आहेत. सरकारच्या बंदीमुळे नाझारा टेकच्या स्टॉकमध्ये विक्री झाली. पोकरबाजी ऑपरेटर, मूनशाईन टेक्नोलॉजीजमध्ये या स्टॉकचा ४६.०७% हिस्सा आहे. आज (२२ ऑगस्ट) ऑनलाइन गेमने ऑफर करणे बंद केले. यामुळे नाझाराचे शेअर एकत्रितपणे तब्बल १७ टक्क्यांनी घसरले.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गेमिंग कंपन्या या बंदीला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. कंपन्यांचे म्हणणे आहे की या कायद्यात पुरेशी चर्चा झालेली नाही, त्यामुळे जलद वाढणाऱ्या गेमिंग क्षेत्राला धोका निर्माण होतो. तसेच, पोकरसारखे कौशल्य-आधारित खेळही चुकीच्या पद्धतीने या बंदीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

Crime: तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली, आधी आई-वडील अन् भावाची हत्या, नंतर मेट्रो स्टेशनवर गेला अन्...

Beed Crime: होमगार्ड महिलेला संपवलं, मैत्रिणीचा खरा चेहरा जगासमोर, शेवटच्या त्या व्हिडिओमुळं झाला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT