Dream 11 : २८ कोटी यूजर, ९६०० कोटींचा महसूल, ड्रीम ११ चा गेम संपणार? पण पैसे परत कसे मिळवायचे?

Dream 11 Updates : ऑनलाइन गेमिंग बिल मंजूर झाल्यानंतर ड्रीम ११ कंपनी बंद होऊ शकते असे म्हटले जात आहे. बिल लागू होण्याआधी यूजर्सनी त्यांचे पैसे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Dream 11
Dream 11 x
Published On
Summary
  • नवीन ऑनलाइन गेमिंग बिल लागू झाल्यानंतर ड्रीम ११ च्या रिअल-मनी गेम्सवर बंदी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • ड्रीम ११ कंपनीने तातडीने रिअम मनी गेम्स युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हटले जात आहे.

  • बिल लागू होण्याआधी ड्रीम ११ वापरकर्त्यांनी त्यांच्या अकाउंटमधील पैसे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसभेनंतर राज्यसभेमध्येही ऑनलाइन गेमिंग बिल मंजूर झाले. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे. खास करुन रिअल मी गेम व्यवसायांशी संबंधित कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. विधेयकामुळे गेमिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी ड्रीम ११ ने गेमिंग सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ड्रीम ११ कंपनीने घाईघाईत आपले रिअल मनी गेमिंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या नव्या गेमिंग बिलात पेड ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ड्रीम ११ कंपनीने रिअल मनी गेमिंग व्यवसाय बंद करण्याचे ठरवले आहे. यामुळे ड्रीम-११ प्लॅटफॉर्मवरील नोंदणीकृत २८ कोटींहून अधिक वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Dream 11
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

फँटसी गेमिंग कंपनी ड्रीम ११ ची सुरुवात २००८ मध्ये झाली. हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी या कंपनीची स्थापना केली. वाढती लोकप्रियता आणि २८ कोटींहून अधिक वापरकर्त्यांच्या संख्येमुळे ड्रीम ११ भारतातील नंबर एकचे फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म बनले. आर्थिक वर्ष २४ मध्ये कंपनीने तब्बल ९,६०० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. यातील ९० टक्के महसूल रिअल-मनी स्पर्धांमधून आल्याचे म्हटले जात आहे. यात क्रिकेट संबंधित खेळांचे मोठे योगदान होते.

Dream 11
Actor Death News : लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

यूजर्सच्या पैशांचं काय?

ड्रीम ११ ॲपमध्ये जमा झालेले पैशांचे भविष्य ऑनलाइन गेमिंग विधेयकाच्या बदलत्या नियमांशी आणि संभाव्य धोरणात्मक बदलांशी जोडलेले आहे. या प्लॅटफॉर्मवर आरबीआय देखील थेट कारवाई करत नाही. सध्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे, ते लागू झालेले नाही. हे विधेयक लागू होण्यापूर्वी तुमचे पैसे काढा. सध्या यातील प्ले टू प्ले ऑप्शन बंद झाले आहे. विधेयक लागू झाल्यानंतर ड्रीम ११ ॲप बंद होऊ शकते. त्यामुळे आताच तुमचे पैसे ताबडतोब काढावेत. अन्यथा तुमचे पैसेही बुडू शकतात.

Dream 11
तो आला अन् माझ्या स्तनांना स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव

ड्रीम ११ च्या रिअल मनी गेम्स युनिटच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, नवा कायदा लागू झाल्यानंतर ड्रीम ११ चे पेमेंट-आधारित गेम सुरु ठेवणे शक्य नसल्याचे सीईओ हर्ष जैन यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. कंपनीने त्याच्याशी संबंधित सर्व कायमस्वरुपी आणि करारावर आधारित नोकऱ्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Dream 11
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका, बिहारमध्ये SIR प्रक्रियेत आधार ग्राह्य धरावाच लागेल

लाँचनंतर ड्रीम ११ चा व्यवसाय झपाट्याने वाढला. २०२१ पर्यंत त्याचे मूल्यांकन ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. ड्रीम ११ कंपनीला टायगर ग्लोबल, क्रिसकॅपिटल, मल्टीपल्स आणि टीसीव्ही यांचे समर्थन आहे. कंपनीने अद्याप रिअल गेम्स युनिट बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या ड्रीम ११ ॲप सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Dream 11
Parliament Monsoon Session : 30 दिवसांची तुरुंगवारी; CM, PM ची खुर्ची जाणार
Q

नवीन ऑनलाइन गेमिंग बिल 2025 म्हणजे नेमकं काय आहे?

A

ही केंद्रीय सरकारने तयार केलेली कायद्याची तरतूद आहे, ज्यात पेड ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे.

Q

या नव्या कायद्यामुळे कोणते गेम्स बंद होणार आहेत?

A

रिअल-मनी गेम्स (ज्यात पैसे जिंकता किंवा गमावता येतात) बंद होतील, फँटसी स्पोर्ट्स व इतर पेमेंट-आधारित गेम्स यावर बंदी येईल.

Q

रिअल-मनी गेम्स म्हणजे काय?

A

ज्या गेम्समध्ये खेळाडूंना पैसे लावून खेळायचे आणि जिंकलेले पैसे मिळवायचे असतात, त्यांना रिअल-मनी गेम्स म्हणतात.

Q

भारत सरकारने हे बिल का आणलं?

A

लोकांना आर्थिक धोका होऊ नये, जास्त पॅसिव्ह किंवा जुगाराप्रमाणे होणारी हानी रोखणे, ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन करणे.

Q

नवीन बिलामुळे Dream11 बंद होणार का?

A

Dream11 ने रिअल-मनी गेमिंग युनिट तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, बिल लागू झाल्यानंतर पेमेंट-आधारित गेम्स बंद होऊ शकते.

Q

Dream11 मधील पैसे परत कसे मिळवायचे?

A

बिल लागू होण्याआधी तुमचे पैसे डेबिट/वितरण करून घ्या.Dream11 ॲपमध्ये जास्तीत जास्त रक्कम काढण्यासाठी त्यांच्या पेमेंट/वापरकर्ता समर्थनाचा वापर करा.

Q

मी आधीच गुंतवलेले पैसे काढू शकतो का?

A

हो, सध्या तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. बिल लागू झाल्यानंतर काही अडचणी येऊ शकतात.

Q

Dream11 ने त्यांच्या गेम्समध्ये काय बदल केले आहेत?

A

प्ले-टू-प्ले ऑप्शन्स बंद केले आहेत, रिअल-मनी गेमिंग युनिट थांबवण्याची तयारी सुरू केली आहे.

Q

नवीन कायद्याचा इतर fantasy apps (My11Circle, MPL, etc.) वर काय परिणाम होईल?

A

इतर फँटसी गेमिंग/पेमेंट-आधारित गेम्सवरही बंदी येईल, सर्व रिअल-मनी गेम्सवर कायदेशीर निर्बंध लागू होतील.

Q

गेमिंग अ‍ॅप्सने वापरकर्त्यांचे पैसे कसे परत करायचे?

A

वापरकर्त्यांना त्यांच्या अकाउंटमधील रक्कम रिफंड करावी, Dream11 सारख्या कंपन्यांनी यासाठी सपोर्ट/कस्टमर केअर टीम उभी केली आहे.

Q

जर कोणी या कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांना काय शिक्षा होईल?

A

आर्थिक दंड, गेमिंग परवाना रद्द होणे किंवा गुन्हेगारी कारवाई होऊ शकते.

Q

ई-स्पोर्ट्स आणि एज्युकेशनल गेम्स याला कायद्यामध्ये सूट आहे का?

A

हो, या गेम्सवर बंदी लागू होत नाही. ते कौशल्य-आधारित असल्यामुळे सुरक्षित मानले आहेत.

Q

नवीन कायद्यामुळे गेमिंग कंपन्यांचे काय होणार?

A

रिअल-मनी युनिट बंद करावे लागतील, फँटसी गेम्स/पेमेंट-आधारित गेम्स बंद होतील.उद्योगाला मोठा आर्थिक धक्का बसेल.

Q

Dream11 ची ग्राहक सेवा/ सपोर्ट टीम कशी संपर्क करावी?

A

Dream11 ॲपमधील “Help & Support” किंवा ईमेल/कॉल सपोर्टचा वापर करावा. पैसे काढणे किंवा अकाउंट संदर्भात मदत घेण्यासाठी संपर्क करा.

Q

काय मी आता Dream11 वर खेळू शकतो?

A

सध्या फक्त कौशल्य-आधारित गेम्स खेळता येतील. पेमेंट-आधारित गेमिंग बंद केले असल्याने पैसे लावून खेळता येणार नाही.

Q

मी माझा Dream11 अकाउंट डिलीट कसा करू?

A

ॲपमधील सेटिंग्ज → Account → Delete Account पर्याय वापरा. सपोर्ट टीमशी संपर्क करून अकाउंट पूर्णपणे बंद करू शकता.

Q

भारतात कौशल्य-आधारित गेम्स कायदेशीर आहेत का?

A

हो, कौशल्यावर आधारित गेम्स कायदेशीर आहेत आणि खेळता येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com