PM Modi Angry Reaction On Women Atrocities Saam Tv
देश विदेश

PM Modi: राक्षसी कृत्य करणाऱ्यांना..., महिला अत्याचारांवर PM मोदींची संतप्त प्रतिक्रिया; लाल किल्ल्यावरून राज्य सरकारला दिले आदेश

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पीएम मोदींनी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. यासाठी त्यांनी देशातील सर्व राज्य सरकारला गांभीर्याने विचार करण्याचे आदेश दिले आहेत.

पीएम मोदींनी भाषण करताना सांगितले की, 'देशात काही चिंतेच्या बाबी आहेत. मला इथून माझी वेदना मांडायची आहे. आपल्या माता, बहिणी, मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून आपण विचार करायलाच हवा. देशात होत असलेल्या अत्याराच्या घटनांमुळे लोकांच्या मनात राग आहे. राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवरील गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास व्हावा. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. कारण समाजात विश्वास संपादन करण्यासाठी हे आवश्यक आहे.'

तसंच, 'महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची चर्चा होते. पण हे राक्षसी कृत्य करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली की या बातम्या दिसत नाहीत. कुठेतरी कोपऱ्यात या बातम्या दिसतात. त्यावर चर्चा होत नाही. आता असे पाप करणाऱ्या गुन्हेगारांबद्दल व्यापक चर्चा व्हायला हवी. जेणेकरून असे पाप करणाऱ्यांनाही फासावर लटकावे लागेल अशी भीती वाटावी. ही काळाची गरज आहे. राक्षसीवृत्ती असणाऱ्या लोकांमध्ये ही भीती निर्माण करणे महत्त्वाचे आहे.' असे मोदींनी यावेळी खडसावून सांगितले.

पीएम मोदींनी पुढे सांगितले की, 'प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली ताकद दाखवून दिली. महिला आधारित विकासाच्या मॉडेलवर आम्ही काम केले आहे. इनोव्हेशन आणि उद्योजकतेसह प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिला फक्त सहभाग घेत नाहीत तर नेतृत्व करत आहेत. आपल्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि अंतराळ क्षेत्रात महिलांची ताकद दिसून येत आहे.' तसंच, गेल्या वर्षांत १० कोटी महिला वुमन सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. याचा आम्हाला गर्व आहे. सामान्य कुटुंबातील १० कोटी महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होत आहेत. जेव्हा महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होतात तेव्हा कुंटुंबात ती महिला निर्णय प्रक्रियेचा भाग होते. ही एक मोठ्या सामाजिक बदलाची गॅरंटी आहे.', असे मत मोदींनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT