Baby Farming Saam Tv
देश विदेश

धक्कदायक! 'इथे' मुलींना बळजबरीने केलं जातं गरोदर! अवैधपणे सुरुये Baby Farming

पीडितेने सांगितली आपबिती

वृत्तसंस्था

जगात अनेक बेकायदेशीर कामे चालतात. पण तुम्ही कल्पना करू शकता का? की जगाच्या एका कोपऱ्यात बेबी फार्मिंग देखील केले जाते. होय हे खरे आहे. आफ्रिका (Africa) खंडातील नायजेरिया या देशात बेकायदेशीरपणे बेबी फार्मिंग केले जाते. यामध्ये तरुणींना बळजबरीने गरोदर केले जाते आणि नंतर त्यांच्या बाळाला विकले जाते. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे जास्ततर अल्पवयीन मुलींना मूल होण्यासाठी यात बळी बनवले जाते. (child harvesting in nigeria)

येथे बेकायदेशीरपणे सुरुये बेबी फार्मिंगचा व्यवसाय!

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात बेबी फार्मिंगचा हा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. Baby Farming साठी, मानवी तस्कर एकतर तरुणींचे अपहरण करतात किंवा त्यांना नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यानंतर आपला हेतू साद्य करून घेतात.

पीडित मुलीने सांगितला हा प्रकार;

याबद्दल एका पीडित मुलीने सांगितले की, तिला कामाच्या बहाण्याने गावाहून आणले होते. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर बलात्कार (Sexual Assault) केला. आश्चर्य म्हणजे गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतरही तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला. तिने सांगितले की, तिला अंधुक प्रकाश असलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते. तिने अनेकवेळा पळून जाण्याचा विचार केला पण त्या खोलीबाहेर रक्षक नजर ठेवण्यासाठी उपस्थित होते, त्यामुळे ती पळून जाऊ शकली नाही. बलात्कार करताना मुलगी 6 आठवड्यांची आहे की 6 महिन्यांची आहे याची त्यांना पर्वा नसते. (Baby farming in nigeria news in marathi)

मुल बाळाची (Male Baby) किंमत जास्त;

पीडितेने पुढे सांगितले की, आम्हाला माहित नाही की आमच्या मुलाला किती किंमतीला विकले गेले. बाळ मुलगा असेल तर त्याची किंमत जास्त असते. मुलाची किंमत 2 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 1 लाख 48 हजार 352 रुपये असते. त्याच वेळी, मुलीला $ 1350 म्हणजेच सुमारे 1 लाख रुपयांना विकले जाते.

हे देखील पहा-

14 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य;

एका अहवालानुसार, मानवी तस्कर (Human Traffickers) हे 14 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करतात. या मुली कधी मानवी तस्करांच्या तावडीतून सुटल्या तर नायजेरियात गर्भपातावर बंदी असल्याने त्यांचा गर्भपात (Abortion) होऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT