मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona) रुग्णांची संख्या अचानकच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. असे असताना पोलीस देखील कोरोनाबाधित होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे पुण्यात (Pune) गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. (Vishwas nangare patil news in marathi)
कोरोनाच प्रादुर्भाव वाढत चालला असून मुंबई पोलीस दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरोना पॉजिटिव्ह (Covid Positive) आढळले आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सोबत संदीप कार्णिक, सत्यनारायण चौधरी, अतुल पाटील, दिलीप सावंत या चार अतिरिक्त पोलिस आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. (Latest News on vishwas nangare patil)
हे देखील पहा-
एन . हरीबालाजी ( डीसीपी ) झोन 1
गीता चौहान ( डीसीपी ) पोर्ट झोन
सोमनाथ घारगे ( डीसीपी ) झोन 12
दत्ता नालावड़े (डीसीपी ) अँटी नार्कोटिक सेल
प्रकाश जाधव ( डीसीपी ) क्राइम
नितिन पवार ( डीसीपी) ट्राफिक वेस्ट
सुनील भारद्वाज ( डीसीपी ) LA4
एन अम्बिका ( डीसीपी )
विशाल ठाकुर (डीसीपी ) झोन 11
नियति ठाकर ( डीसीपी ) SB 2
बालकृष्ण यादव ( डीसीपी ) वायरलेस
विजय पाटील ( डीसीपी) झोन 4
मंजूनाथ सिंगे ( डीसीपी ) झोन 4
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.