IIT Youth End Life Saam Tv
देश विदेश

आयआयटीमध्ये पीएचडी विद्यार्थ्याची आत्महत्या, सहाव्या मजल्यावरून उडी मारली, कॅम्पसमध्ये शोककळा

IIT Kanpur PhD student suicide news : आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी करणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एंजायटी आणि डिप्रेशनमुळे तो त्रस्त होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

Namdeo Kumbhar

IIT Kanpur Student Suicide: आयआयटी ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) कानपूरमध्ये एक दुःखद आणि हादरवणारी घटना घडली आहे. पीएचडी करणारा २५ वर्षांचा विद्यार्थ्याने कॅम्पसमधील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रामस्वरूप ईशराम असे त्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर कानपूर कॅम्ससमध्ये शोककळा पसरली. एंजायटी आणि डिप्रेशनच्या आजाराने रामस्वरूप त्रस्त होता, त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. (PhD scholar jumps from sixth floor IIT campus)

रामस्वरूप याने मंगळवारी दुपारी दीड वाजता कॅम्पसमधील न्यू एसबीआरए इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामस्वरूप राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी होता. तो अर्थ सायन्सेस विभागात पीएचडी करत होता. रामस्वरूप जुलै २०२३ पासून कानपूर आयआयटीत होता. त्याची पत्नी मनजू आणि तीन वर्षांची मुलगी यांच्यासोबत तो कॅम्पसमध्येच राहत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, रामस्वरूप मागील काही दिवसांपासून एंजायटी आणि डिप्रेशनच्या आजाराने त्रस्त होता. त्याची काउंसलिंगही सुरू होती. रामस्वरूप याच्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला अन् पोस्टमॉर्टेमाठी पाठवण्यात आला आहे. आयआयटी कानपूरमध्ये मागील तीन आठवड्यात दुसरी आत्महत्याची घटना घडली आहे. यापूर्वी २९ डिसेंबरला बीटेकचा एक विद्यार्थ्याने अशीच आत्महत्या केली होती.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपायुक्त एसएम कासिम आबिदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, हा विद्यार्थी बऱ्याच काळापासून नैराश्य आणि चिंताग्रस्त होता, असे प्राथमिक तपासात असे दिसून आले. त्याचे अनेक वेळा काउंसलिंगही झाले होते. तपासाचा भाग म्हणून पत्नीची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मृताच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, आजारपणामुळे रामस्वरूप तणावाखाली होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT