Lok Sabha Election
Lok Sabha Election SAAM TV
देश विदेश

Lok Sabha Survey: आता लोकसभा निवडणूक झाली तर INDIA-NDA ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणात धक्कादायक माहिती आली समोर

Satish Kengar

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीला आता काहीच महिने उरले आहेत. यातच आता लोकसभा निवडणुका झाल्या तर बहुमत कोणाला मिळणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ताज्या सर्वेक्षणात इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीला मिळणाऱ्या अंदाजे जागांची आकडेवारी देण्यात आली होती.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात एनडीए आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज वरावण्यात आलं आहे. या सर्वेक्षणानुसार एनडीए आघाडीला 295 ते 335 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरांना 35 ते 65 जागा मिळू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणाच्या प्रदेशनिहाय आकडेवारीत, इंडिया आघाडी आणि एनडीएने वेगळी आघाडी कायम ठेवली आहे. सर्वेक्षणात उत्तर भारतातील 180 जागांपैकी एनडीएला 150 ते 169 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला येथे केवळ 20 ते 30 जागा मिळताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

याशिवाय उत्तर भारतातील इतरांना 0 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. यातच दक्षिण भारतातील आकडेवारी पूर्णपणे वेगेळी आहे. सर्वेक्षणानुसार, दक्षिण भारतातील 132 जागांपैकी एनडीएला केवळ 20 ते 30 जागा मिळत आहेत. येथे इंडिया आघाडीला 70 ते 80 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर इतरांना 25 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे.

त्याचप्रमाणे जर आपण पूर्व भारताबद्दल बोललो तर एबीपी न्यूज आणि सी व्होटर सर्वेक्षणात येथे 130 जागांपैकी एनडीएला 80 ते 90 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. एनडीएची येथे इंडिया आघाडीसोबत कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला पूर्व भारतात 50 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना येथे 10 ते 20 जागा मिळू शकतात.

जर आपण पश्चिम भारताबद्दल बोललो तर येथे लोकसभेच्या एकूण 78 जागा आहेत. येथे एनडीएला 45 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच इंडिया आघाडीला 70 ते 80 जागा मिळू शकतात. तर इतरांना 0 ते 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा

Ghatkopar Hording Collapse: धक्कादायक! घाटकोपर दुर्घटनेतील इगो मीडिया कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग्स; पालिकेचा कारवाईचा इशारा

Lady Finger Benefits: गंभीर आजार होतील छू मंतर; भेंडी खाण्याचे जबरदस्त फायदे

Today's Marathi News Live: पुण्यात तिसऱ्या दिवशी हत्येची घटना, डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

Engagement Ring Designs : साखरपुड्यासाठी लेटेस्ट रिंग डिझाइन

SCROLL FOR NEXT