ICSE ISC Result 2025 Saam Tv
देश विदेश

ICSE ISC Result 2025: सीआईएससीई १० वी आणि १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पहाल रिझल्ट?

CISCE Board Result: सीआईएससीईच्या १० वी आणि १२ वी बोर्डाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा चेक करायचा हे घ्या जाणून...

Priya More

काउंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनने म्हणजेच सीआयएससीई (CISCE) बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली. दहावी आणि बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. सीआयएससीईने बुधवारी सकाळी ११ वाजता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले. अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही निकाल तपासू शकता.

आयसीएसईमध्ये ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर आयएससीमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.०२ आहे. आयसीएसईमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.३७% आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.८४ टक्के इतकी आहे. दहावीमध्ये ६७ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर बारावीमध्ये ४७ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांना ISE इयत्ता दहावी आणि ISC इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल cisce.org आणि result.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळतील. वेबसाइट व्यतिरिक्त, इयत्ता १०वी-१२वीचा निकाल डिजीलॉकर अॅपवर देखील उपलब्ध होईल. आयएससी बारावीच्या परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.

आयएससी बारावीचा निकाल उमेदवाराचे नाव, शाळेचे नाव, रोल नंबर, विषय आणि त्यांचे गुण आणि गुणपत्रिकेच्या स्वरूपात जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी या तपशीलांची पडताळणी करावी आणि काही तफावत आढळल्यास शाळा अधिकाऱ्यांना कळवावे, असे सांगण्यात आले आहे.

तुम्ही डिजीलॉकरवरून दहावी आणि बारावीचे निकाल पाहू शकता. CISCE वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थी results.digilocker.gov.in ला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकता. निकालाच्या लिंक्स डिजीलॉकरवर दिसतील. दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. इंडेक्स नंबर, युनिक आयडी आणि जन्मतारीख सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहायला मिळेल. तर बारावीचा निकाल पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. इंडेक्स नंबर, युनिक आयडी आणि जन्मतारीख सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT