Loksabha Election Result: लोकसभेच्या निकालाचा पहिला कल हाती, 'मविआ'ची जोरदार मुसंडी, बारामतीत कोण आघाडीवर?

Loksabha Election Result 2024: देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतमोजणीला सुरूवात होताच एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSAAM TV

४ जून २०२४

देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल आज समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिलेला भारतीय जनता पक्ष हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मतमोजणीला सुरूवात होऊन पहिला कल समोर आला आहे.

पहिला कल कोणाच्या बाजूने?

देशातील ५४३ लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या समोर येत आहेत. मतमोजणीला सुरूवात होताच भारतीय जनता पक्षाची एनडीएने ४९ ठिकाणी आघाडी घेतली आहे इंडिया आघाडीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच वायनाडमधून राहुल गांधी, तर कन्नौजमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.

बारामतीत सुप्रिया सुळेंची आघाडी

राज्यात महाविकास आघाडीने सुरूवातीला बाजी मारली असून बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ तर दिंडोरीमधू भास्कर भगरे आघाडीवर आहेत. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अनेक ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे.

Maharashtra Political News
Jayant Patil News: 'सतर्क रहा; मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता', जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र!

दरम्यान, नागपुरमध्ये पहिल्या फेरीत नितीन गडकरींनी आघाडी घेतली आहे. तर जालन्यामध्ये मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोस्टल मतमोजणीत सरशी झाल्याचे दिसत आहे. कल्याण लोकसभेत पोस्टल मतदानात श्रिकांत शिंदे पुढे आहेत. तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

Maharashtra Political News
Loksabha Election Result: ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणीआधीच भाजपने खातं खोललं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com