Jayant Patil News: 'सतर्क रहा; मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता', जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र!

Maharashtra Loksabha Election Result 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांमध्ये समोर येणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहित सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Jayant Patil News: 'सतर्क रहा; मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता', जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र!
Maharashtra Loksabha Election Result 2024: Saamtv

मुंबई, ता. ४ जून २०२४

देशासह राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमधील निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी मुसंडी मारणार की महायुतीची सरशी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहित भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे.

काय आहे जयंत पाटील यांचे पत्र?

"देशातील लोकसभा निवडणूक मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. अशा स्थितीत सत्ताधा-यांनी नेहमीप्रमाणे आपला स्वार्थ हा एक्झिट पोल'च्या माध्यमातून साधायला सुरुवात केली आहे. सत्ताधा-यांना जवळपास ३०० जागांची आघाडी मिळणार असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचं काम मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही यंत्रणा करत आहेत. ही निव्वळ देशवासियांची फसवणूक असून मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर सत्ताधा-यांकडून रडीचा डाव खेळणं सुरु झालेलं आहे," असा संशय जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तसेच "देशात INDIA आघाडीलाच' बहुमत मिळणार असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं असताना देखील अशाप्रकारे सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. कारण, तुम्हाला संभ्रमात टाकून तुमचा उत्साह कमी केला जाऊ शकतो. जेणेकरून तुम्ही दक्ष आणि सक्रिय नसाल आणि ही संधी साधून चंदीगढप्रमाणेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणालेत.

Jayant Patil News: 'सतर्क रहा; मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता', जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र!
Loksabha Election: कोल्हापूरमध्ये सतेज पाटील ठरणार किंगमेकर? कोल्हापुरात कुणाचा कंडका पडणार?

"मतमोजणीमध्ये सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची कुठलीच शक्यता नाकारून चालणार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण मतमोजणीच्या दिवशी सतर्क राहणं अधिक गरजेचं आहे.त्यामुळे मी तुम्हाला मनापासून आवाहन करतो की, कृपया सत्ताधा-यांच्या या 'एक्झिट पोल' प्रोपगंडाला बळी पडून स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका! मतमोजणी पारदर्शक आणि नियमानुसार कशी होईल याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे," असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

Jayant Patil News: 'सतर्क रहा; मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता', जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र!
Maharashtra Politics: ब्रेकिंग! भाजपकडून विधानपरिषदेचे ३ उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरसाठी तिरंगी लढतीची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com