Madhya Pradesh transfers 23 IAS officers in late-night order saam tv
देश विदेश

IAS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ११ जिल्ह्यांना मिळाले नवे कलेक्टर

IAs Transferred: मध्य प्रदेश सरकारने मध्यरात्री २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. सुखबीर सिंह यांची मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.

Bharat Jadhav

  • राज्य सरकारने २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

  • ११ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

  • १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा प्रशासकीय बदल्यांचे आदेश

मध्य प्रदेशच्या मोठी प्रसशासनात मोठा फेरबदल झालाय. मंगळवारी रात्री उशिरा सरकारचा आदेश जारी करत आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी सुखवीर सिंह यांची मुख्यमंत्रींचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. यासह मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही बदलण्यात आलेत.

सरकारच्या आदेशानुसार अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. दरम्यान, सुखवीर सिंग यांची मुख्यमंत्री मोहन यादव यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, वरिष्ठ आयएएस अधिकारी भरत यादव यांच्याकडे जनसंपर्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय.

या जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले

मध्य प्रदेशातील काही प्रमुख जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बदलण्यात आलेत. पन्नाच्या जिल्हाधिकारी उषा परमार यांची फलोत्पादन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. २०१२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी राजेश कुमार ओगरे यांची मऊगंजचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

नर्मदापुरमचे जिल्हाधिकारी सोमेश मिश्रा यांची 'एड्स नियंत्रण सोसायटी'चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. जबलपूरचे जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांची कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. दरम्यान, २०१३ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी पवन कुमार जैन यांची भिंडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

२०१४ च्या तुकडीचे आयएएस (IAS) अधिकारी अरुण कुमार विश्वकर्मा यांची जबलपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. आशिष वशिष्ठ यांची नर्मदापुरमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१४ च्या तुकडीच्याच आयएएस अधिकारी अंकिता अस्थाना यांची सिंगरौलीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. आदित्य सिंग यांची बालाघाटचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

शाजापूरच्या जिल्हाधिकाऱ्याची बदली

गेल्या काही प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या शाजापूर येथील जिल्हाधिकारी ऋजू बाफना यांची बदली करण्यात आलीय. त्यांची उज्जैन विभागाचे अतिरिक्त आयुक्त (महसूल) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. २०१५ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी हर्ष सिंह यांची पन्नाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. मऊगंजचे जिल्हाधिकारी संजय कुमार जैन यांचीही बदली करण्यात आली आहे. तसेच हरदाचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ जैन, भिंडचे जिल्हाधिकारी किरोडी लाल मीना आणि सिंगरौलीचे जिल्हाधिकारी गौरव बानल यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

रोहित सिसोनिया बनले रायसेनचे जिल्हाधिकारी

२०१७ च्या तुकडीचे आयएएस (IAS) अधिकारी रोहित सिसोनिया यांची रायसेनचे जिल्हाधिकारी म्हणून, तर विवेक कुमार यांची बुरहानपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. परीक्षित संजयराव झाडे यांची शाजापूरचे जिल्हाधिकारी आणि कुमार सत्यम यांची हरदाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तसेच, २०१८ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी संदीप केरकेट्टा यांची इंदूर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याला नवीन मेडिकल कॉलेज मिळालं - देवेंद्र फडणवीस

UP Elections: विधानसभाआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; हायकोर्टाचे 3 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश

Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ६९ हजार, पेन्शन ३४,४७० रुपये करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT