IRS Officer Gets Name And Gender Changed Saam Tv
देश विदेश

Hyderabad News: ऐतिहासिक! IRS महिला अधिकारी बनली पुरूष; नवं नावही मिळालं, सरकारनंही दिली मंजुरी

IRS Officer Gets Name And Gender Changed: भारतीय महसूल सेवा म्हणजेच आयआरएस अधिकाऱ्याचे नाव आणि लिंग बदलण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजूर केले. त्यांना आता एम अनुसूयावरून एम अनुकथिर सूर्या म्हणून ओळख मिळाली.

Priya More

हैदराबादमधील (Hyderabad) भारतीय महसूल सेवेमध्ये तैनात असलेली एक महिला अधिकारी लिंग बदलून आता पुरूष झाली आहे. लिंग बदलानंतर या महिला अधिकारीने आपले नावही बदलले आहे. आता या अधिकाऱ्याचे नाव एम अनुसूयावरून (m anusuya) एम अनुकथिर सूर्या (m anukathir surya) असे झाले आहे. त्यांच्या या निर्णयाला अर्थ मंत्रालयानेही मान्यता दिली आहे. भारतीय महसूल सेवा म्हणजेच आयआरएस (IRS) अधिकाऱ्याचे नाव आणि लिंग बदलण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजूर केले. भारतीय नागरी सेवेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.

आयआरएस अधिकारी एम. अनुसूया यांनी त्यांचे नाव अनुकथिर सूर्या आणि लिंग स्त्रीवरून पुरुष असे बदलण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे मंजुरी मागितली होती. त्यांनी केलेली ही मागणी अर्थ मंत्रालयाकडून मंजूर झाली आहे. अर्थमंत्रालयाने त्यांची मागणी मान्य केल्यानंतर आता त्यांनी त्यांचे नाव एम अनुसूयावरून एम अनुकथिर सूर्या असे केले आहे. यासोबतच आतापासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव एम अनुकथिर सूर्या या नावाने ओळखले जाणार आहे. त्यांनी सरकारला आपले नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती सरकारने मान्य केली. यासोबतच याबाबत आदेशही जारी करण्यात आला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सच्या अधिसूचनेनुसार, IRS एम. अनुसया सध्या मुख्य आयुक्त म्हणून नियुक्त आहेत. त्यांनी आपले नाव एम अनुसूया वरून एम अनुकथिर सूर्या असे बदलण्यात यावे आणि लिंग बदलून स्त्रीचे पुरुष करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता मुख्य आयुक्त अधिकारी हे सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये एम अनुकथिर सूर्या या नावाने ओळखले जातील.

महत्वाचे म्हणजे या निर्णयाचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. हा अभूतपूर्व आदेश असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्हाला अधिकारी आणि आमच्या मंत्रालयाचा अभिमान आहे. हा आदेश मुख्य आयुक्त, सीमाशुल्क, अबकारी, सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण आणि CBIC अंतर्गत सर्व प्रधान मुख्य आयुक्त/प्रधान महासंचालकांना पाठवण्यात आला आहे.

सूर्या यांनी डिसेंबर २०१३ मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर २०१८ मध्ये त्यांना उपायुक्त करण्यात आले. गेल्या वर्षी ते हैदराबादमध्ये सध्याच्या पोस्टिंगवर रुजू झाले. त्यांनी चेन्नईतील मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी २०२३ मध्ये भोपाळ येथील नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमा पूर्ण केला.

दरम्यान, १५ एप्रिल २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टाने NALSA प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला होता. लिंग ओळख निवडणे ही कोणाचीही वैयक्तिक निवड आहे, असे कोर्टाने सांगितले होते. ओडिशातील एका अधिकाऱ्याने ओडिशा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सहभागी झाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच २०१५ मध्ये त्यांचे लिंग बदलून स्त्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना ऐश्वर्या ऋतुपर्णा प्रधान म्हणून ओळख मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT