PPF News : सुकन्या समृद्धीसह 'या' योजनांच्या नियमांत मोठा बदल, अर्थमंत्रालयाने दिले निर्देश!

या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या आणि गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे.
PPF News
PPF News Saam Tv

Public Provident Fund News : कुटुंबाच्या भविष्याचा विचार करुन प्रत्येक जण अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अनेकांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान योजना आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली असेल. या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या आणि गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. (Latest Marathi News)

PPF News
Shirdi Sai Baba: धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य; साईभक्तांकडून निषेध

कारण केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Ministry of Finance) सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या सर्व योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना देखील जारी केली आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने नियम बदलले आहेत. या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड (PAN) आणि आधारकार्ड (AADHAAR) आवश्यक करण्यात आले आहेत.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे बदल सरकारद्वारे जारी केलेल्या अल्प बचत योजनेसाठी केवायसी (KYC) म्हणून वापरले जाणार आहेत. याआधी तुम्ही या बचत योजनांमध्ये आधारकार्ड क्रमांकाशिवाय पैसे जमा करु शकत होता. पण आता या योजनांमध्ये कोणत्याही प्रकराची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकदारांना आधारकार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. तसंच, एका मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी त्यांना पॅनकार्ड देखील दाखवावे लागणार आहे.

पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी खाते उघडताना तुमच्याकडे आधारकार्ड क्रमांक नसल्यास तुम्हाला आधार कार्डसाठी नोंदणी स्लिपचा पुरावा द्यावा लागेल. त्यासोबतच गुंतवणूकदाराला या लघु बचत योजनांच्या गुंतवणुकीशी जोडण्यासाठी खाते उघडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आतमध्ये आधार क्रमांक द्यावा लागेल.

PPF News
Nandurbar News: तर रस्‍त्‍यांवर पसरणार अंधार; ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांची २१९ कोटीची थकबाकी

लघु बचत योजना खाते उघडण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक -

- पासपोर्ट साइज फोटो

- आधारकार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप

- पॅनकार्ड क्रमांक

महत्वाचे म्हणजे, जर विद्यमान गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर केले नाही तर त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बॅन केले जाईल. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी या सर्व गोष्टींची नोंद घेत वेळीच त्यांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड सादर करावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com