Shirdi Sai Baba: धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य; साईभक्तांकडून निषेध

धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य; साईभक्तांकडून निषेध
Shirdi Sai Baba
Shirdi Sai BabaSaam tv
Published On

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता (Sai Baba) साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा (Shirdi) शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला असून धिरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Tajya Batmya)

Shirdi Sai Baba
Jalgaon News: किराणा दुकानातील नोकराने परस्‍पर विकला पावणे सहालाखांचा सामान

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की नाही? यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धिरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल; अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात.

Shirdi Sai Baba
Nandurbar News: तर रस्‍त्‍यांवर पसरणार अंधार; ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांची २१९ कोटीची थकबाकी

संत परंपरा समजून घ्यावी

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साईसंस्थाकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली. मात्र आम्ही बाबांच्या शिकवणूकीप्रमाणे चालतो. धिरेंद्र शास्त्रीने महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये; असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धिरेंद्र शास्त्रीना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com