Nandurbar News: तर रस्‍त्‍यांवर पसरणार अंधार; ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांची २१९ कोटीची थकबाकी

तर रस्‍त्‍यांवर पसरणार अंधार; ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांची २१९ कोटीची थकबाकी
Nandurbar News Mahavitaran
Nandurbar News MahavitaranSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील २ हजार पथदिव्यांचे तब्बल सव्‍वा दोनशे कोटी रुपये बिल थकीत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवर आणि ग्रामपंचायती (Gram Panchayat) हद्दीतील पथदिवे लावण्यात आलेले आहेत. मात्र या वीजबिल भरलं जात नाही. त्यामुळे आता (Nandurbar News) जिल्ह्यातील रस्ते अंधारात बुडणार आहेत. (Live Marathi News)

Nandurbar News Mahavitaran
Solapur Water Supply : सोलापूर शहरात ४ दिवसांआड पाणी पुरवठा; तुमच्या घरी केव्हा येणार पाणी?

महावितरणची ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांच्या बिलापोटी तब्बल २१९ कोटी रुपयांची थकबाकी असून ३१ मार्चला ही रक्कम भरण्याची शेवटची मुदत होती. परंतु ही रक्कम भरण्यात आलेली नाही आहे. महावितरणकडून सध्या थकबाकीदार वीज ग्राहकांकडून बिलांची वसुली करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Nandurbar News Mahavitaran
Jalgaon News: किराणा दुकानातील नोकराने परस्‍पर विकला पावणे सहालाखांचा सामान

आता वीज पुरवठा होणार खंडीत

मोहिमेअंतर्गत घरगुतीसह कृषी, व्यावसायिक, औद्योगिक, स्थानिक स्वराज्य संस्था पथदिवे, पाणीपुरवठा यासह विविध योजनांसाठीचा वीजबिल भरणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बिल भरले जात नसल्याने तीन एप्रिलपर्यंत ज्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था बिल भरणार नाही. तर वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे आता (Mahavitaran) महावितरण कंपनीची तिजोरी मालामाल होती का खाली राहणार हे आता महत्त्वाच्या ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com