Uttar Pradesh Accident: भीषण अपघात! डबल डेक्कर बसची दूधाच्या टँकरला जोरदार धडक, १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Bus Accident On Lucknow Agra Expressway With Milk Container: उत्तर प्रदेशमध्ये डबल डेक्कर बसचा भीषण अपघात झालाय. दूधाच्या टँकरला दिलेल्या धडकेत १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय.
डबल डेक्कर बसचा भीषण अपघात
Uttar Pradesh AccidentSaam Tv
Published On

उत्तर प्रदेश: आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर आज पहाटे सव्वा पाच वाजता बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला धडक दिली. या अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल केलं आहे. मृतदेह ताब्यात घेऊन कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

कसा झाला अपघात?

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये आज बुधवार १० जूलै रोजी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. येथील लखनऊ-आग्रा द्रुतगती मार्गावर झालेल्या या भीषण अपघातात एका डबलडेकर बसने मागून येणाऱ्या कंटेनरला धडक (Uttar Pradesh Accident) दिली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झालेत. या भीषण अपघाताचा बळी ठरलेली स्लीपर बस बिहारमधील शिवगड येथून दिल्लीच्या दिशेने जात होती. अपघातामुळे बस पलटी होऊन मधूनच दोन भागात विभागली गेली.

घटनास्थळी वाऱ्याच्या वेगात बचावकार्य

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव पोलीस ठाण्याच्या बेहता मुजावर क्षेत्रांतर्गत आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर ही घटना (Bus Accident) घडली. यामध्ये डबल डेकरने दुधाच्या टँकरला मागून धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बेहता मुजावर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल (Accident News) केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डबल डेक्कर बसचा भीषण अपघात
Palghar Accident: रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

मदतकार्य त्वरीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ता अपघाताची (Lucknow Agra Expressway) दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केलंय. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डबल डेक्कर बसचा भीषण अपघात
Bus Accident Video : चालकाचे नियंत्रण सुटलं अन् खासगी बस थेट दरीत, सापुतारा घाटातील अपघाताचा थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com