Ichalkaranji Municipal Corporation : अजब-गजब सरकार, खुर्ची एक.. आयुक्त दोन; इचलकरंजीत रंगला तू-तू मै-मैचा खेळ

Ichalkaranji News : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासनाचा अजब कारभार पाहायला मिळाला. दोन आयुक्तांनी एकाच महापालिकेत पदभार स्वीकारलाय. चक्क एकाच केबिनमध्ये दोन्ही आयुक्तांनी खुर्ची टाकली.
Ichalkaranji Municipal Corporation
Ichalkaranji Municipal CorporationSaam Digital
Published On

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासनाचा अजब कारभार पाहायला मिळाला. दोन आयुक्तांनी एकाच महापालिकेत पदभार स्वीकारलाय. चक्क एकाच केबिनमध्ये दोन्ही आयुक्तांनी खुर्ची टाकली. नक्की काय घडलंय पालिकेत पाहूया या रिपोर्टमधून.

खुर्ची एक आणि आयुक्त दोन असा खेळ इचलकरंजी महापालिकेमध्ये रंगला. मीच खरा आयुक्त असा दावा दोन्ही अधिकाऱ्यांनी केल्यामुळे महापालिकेत मोठी खळबळ माजाली. आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्यामध्ये आयुक्त पदावरून तू तू मैं मैं झाल्याची चर्चाही आहे. इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची 11 जून रोजी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आणि मोठा गोंधळ झाला. एकाच केबिनमध्ये आयुक्त म्हणून कामकाज करत असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ओमप्रकाश दिवटे 14 जून रोजी सकाळी आयुक्तपदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारण्यासाठी महापालिकेत दाखल झाले. तत्पूर्वी पल्लवी पाटील यांनी कार्यभार हाती घेतला होता. दिवटे यांनी मॅटकडून बदलीला स्थगिती मिळवल्याचं सांगितलं. त्यावर आयुक्त पल्लवी पाटील यांनी कार्यभार सोडण्याविषयी आपल्याला कोणतेही आदेश नसल्याचं उत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही अधिकारी एकाच केबिनमध्ये आयुक्त म्हणून कामकाज करू लागले.

Ichalkaranji Municipal Corporation
Rohit Pawar On Nilesh Lanke : निलेश लंके गजा मारणे भेट,...पण रोहित पवारांनी का मागीतली माफी?; जाणून घ्या

यामुळे नेमके आयुक्त कोण ? अशी चर्चा ही रंगली. एका तासांनतर आयुक्त ओमप्रकाश दिवटेंनी बदलीच्या आदेशाला स्थगिती आणल्याचे कागदपत्र सादर केले...त्यानंतर पल्लवी पाटील यांनी आपला पदभार सोडला. आयुक्तांचा वाद शमला आहे. मात्र एका खुर्चीवर दोन आयुक्तांना जोर गोंधळ झाला त्यावरून सरकाच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव जनतेलाच नव्हे तर अधिका-यांना आला.

Ichalkaranji Municipal Corporation
Maharashtra Politics 2024 : भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लान ! लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं अलर्टवर, महत्त्वाच्या मुद्द्यालाच हात घातला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com