उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झालीये. त्यात चमोलीयेथे मोठ्याप्रमाणात भूस्खलन झालं आहे. या घटनेमुळे बद्रीनाथ नॅश्नल हायवे देखील बंद ठेवण्यात आला आहे. या भीषण घटनेचा एक भयंकर व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या रस्त्यावरून अनेक नागरिक प्रवास करत आहे. त्यात अचानक डोंगराचा काही भाग खाली पडू लागला. भूस्खलन होत असल्याचं लक्षात येताच येथील व्यक्ती तेथून थोडे दूर झाले. तितक्यात डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. हे दृश्य खरोखर काळजात धस्स करणारं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर अनेक नागरिक येथे उभे आहेत. डोंगर कोसळताच सर्वजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळापळ करत आहेत. आरडाओरडा आणि किंकाळ्या देखील यात ऐकू येत आहे.
भूस्खलन झाल्याने येथील व्यक्तींच्या मनात मोठी भीती बसली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्ता बंद झाला असून येथील वाहतूक ठप्प आहे. या रस्त्यावर अनेक वाहने आणि काही नागरिक देखील अडकून पडलेत. जुलै महिना सुरू होताच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे डोंगराची माती खाली सरकत असून दरड कोसळत आहेत. बद्रीनाथसाठी जाणाऱ्या अनेक ठिकाणी रस्त्यावर मातीचा ढिगारा पडला आहे.
सततच्या पावसाने अनेक रस्त्यांवर ही परिस्थिती आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. चंपावत आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी साठलं आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सदर भूस्खलनाची घटना शुक्रवारी घडली आहे. यामुळे बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आलाय. त्यामुळे भानेरपाणी-पिपळकोटी, नागा पंचायत रस्ता आणि अंगठाळा रस्त्यावर नागरिकांची गर्दी वळवण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.