Viral Video : किंकाळ्या, आरडाओरडा आणि कामावर पोहचण्याची धडपड; ठाणे स्थानकातील जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

Thane local train viral video : पावसामुळे बदलापूर, कर्जत आणि कसारा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन फक्त ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत सोडल्या जात आहेत. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झालेत.
Thane local train viral video
Viral VideoSaam TV
Published On

मुंबईकरांसाठी आजची सकाळ मोठी डोकेदुखीची ठरली आहे. पावसामुळे बदलापूर, कर्जत आणि कसारा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन फक्त ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत सोडल्या जात आहेत. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झालेत. त्यातीलच ठाणे रेल्वे स्थानकातील महिलांच्या डब्ब्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Thane local train viral video
Mumbai Local Train : मुंबईकरांची लवकरच गर्दीतून होणार सुटका, लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याच्या रेल्वे मंत्रालयाकडून सूचना

पाऊस असो अथवा काही असो मुंबई आणि मुंबईमधील नोकरदारांना कामावर हजर रहावेच लागते. पावसामुळे लोकलसेवा ठप्प झाली असली तरी अनेक चाकरमानी कामावर जाण्यासाठी सकाळी निघाले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात मोठ्याप्रमाणात गर्दी जमा झाली. या गर्दीमध्ये ट्रेन पकडण्याची धडपड काही महिला करत आहेत.

ट्रेनमध्ये बसायला सीट नाही मिळाली तरी चालेल पण निदान उभं तरी राहता यावं या विचाराने महिला आर्धा ते एक तास रेल्वे स्थानकात उभ्या होत्या. ट्रेन येताच सर्वांनी ट्रेन पकडण्यासाठी मोठी गर्दी केली. या गर्दीत कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला तर कुणाच्या डोक्याला लागलं आहे. गर्दीमध्ये दररोज प्रावाशी अशाच पद्धतीने धक्के खात प्रवास करतात. मात्र रेल्वेसेवा ठप्प झाल्यावर हा त्रास दुप्पटीने सहन करावा लागतो.

मध्य लोकलसेवा विस्कळीत झाल्याने लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनवर देखील आज याचा परिणाम झाला आहे. अंबरनाथ स्थानकामध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस सकाळी ४ तासांपासून खोळंबली होती. अखेर आता ही ट्रेन मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे.

मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाशांना सुद्धा फटका बसला आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणारी रेल्वे अर्धा तास उशिराने धावत आहे. तर मुंबईहून येणाऱ्या रेल्वे उशिरा असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडालीये. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे. मुंबईहून भुसावळसह अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळित झालीये.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील चाकरमान्यांना या गर्दीचा आणि वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो. मुंबईमधील ट्रेन म्हणजेच मुंबईची लाइफलाइन आहे असं म्हटलं जातं. रेल्वे प्रशासनाकडून यावर वारंवर कामे केली जातात. मात्र दरवर्षी परिस्थिती कायम जैसे थे तशीच असते. रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

Thane local train viral video
Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com